Health Tips : जीवघेण्या आजारांपासून वाचायचं असेल तर सकाळी करा हे एक काम, वाचाल तर लगेच सरू कराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 01:23 PM2022-02-09T13:23:15+5:302022-02-09T13:24:04+5:30

Mouth Cleaning : सकाळचं हे रूटीन तुम्हाला काही जीवघेण्या आजारापासून वाचलं जाऊ शकतं. त्यामुळे सकाळी तोंडाची चांगली स्वच्छता आणि काळजी घेणं फार गरजेचं आहे.

Morning routine flossing can reduce risk of killer diseases, Dementia, heart disease, blood clots | Health Tips : जीवघेण्या आजारांपासून वाचायचं असेल तर सकाळी करा हे एक काम, वाचाल तर लगेच सरू कराल!

Health Tips : जीवघेण्या आजारांपासून वाचायचं असेल तर सकाळी करा हे एक काम, वाचाल तर लगेच सरू कराल!

googlenewsNext

Mouth Cleaning : सकाळी उठून तोंडाची स्वच्छता करणं सर्वांच्या रूटीन लाइफचा महत्वाचा भाग असतो. तोंडाची स्वच्छता करण्यासाठी लोक अनेकप्रकारच्या पद्धती वापरतात. ज्यात जीभ, दात आणि तोंडाची स्वच्छता केली जाते. डॉक्टरांनुसार, सकाळचं हे रूटीन तुम्हाला काही जीवघेण्या आजारापासून वाचलं जाऊ शकतं. त्यामुळे सकाळी तोंडाची चांगली स्वच्छता आणि काळजी घेणं फार गरजेचं आहे.

'आस्क द डेंटिस्ट' नावाच्या चॅनलचे डॉक्टर मार्क बुरहेनने सांगितलं की, 'जर तुमचं तोंड हेल्दी नसेल तर तुम्ही हेल्दी राहू शकत नाहीत'. फ्लॉसिंग जास्तीत जास्त लोकांच्या महत्वाचा भाग आहे. फ्लॉसिंगमुळे दात स्वच्छ राहतात, सोबतच याने काही जीवघेण्या आजारापासून बचावही होतो. त्यांच्यानुसार, फ्लॉसिंगची काही अशीही कारणं आहेत, जी दातांसोबतच तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

फ्लॉसिंगमुळे दातांची खोलवर स्वच्छता होते. जेवण करताना दातांमध्ये अन्न फसतं. ज्यामुळे तोंडात अनेक बॅक्टेरिया निर्माण होतात. दातांमध्ये फसलेलं अन्न काढण्यासाठी एका बारीक धाग्याने स्वच्छता केली जाते. यालाच फ्लॉसिंग असं म्हणतात.

फ्लॉसिंग, मनोभ्रंश, हृदयरोग, रक्ताच्या गाढी तयार होणे आणि प्रजनन क्षमता वाढण्यास मदत मिळते. २०१९ च्या रिसर्चनुसार, तोंडात सामान्यपणे तयार होणारे बॅक्टेरिया तोंडात हानिकारक बॅक्टेरिया तयार करतात. जे मेंदूत जाऊ शकतात. ज्यामुळे विसरण्याची किंवा अल्झायमरची समस्या होऊ शकते. तेच हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या तज्ज्ञांनुसार, हृदयरोग दूर ठेवण्यासाठी तोंड चांगल्या प्रकारे स्वच्छ असणं गरजेचं आहे.

फ्लॉसिंगचे फायदे

डॉ. मार्क बुरहेन यांनी सांगितलं की, रिसर्चमधून समोर आलं आहे की, ज्या लोकांची ओरल हेल्थ चांगली असते. त्यांच्या तुलनेत ज्या लोकांच्या लोकांच्या तोडांची हेल्थ फारच खराब असते, हिरड्यांची समस्या किंवा दात पडण्याच समस्या असेल तर त्यांना हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची शक्यता अधिक असते.

ब्रिटिश डेंटल फाउंडेशनचे प्रमुख डॉ. निगेल कार्टर यांच्यानुसार, जर काही लोकांच्या तोंडात सूज असेल तर हे शरीरात सूज येण्याचं कारणही बनू शकतं. तोडं मिडिएटरच्या रूपात काम करतो आणि मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा प्रवाह वाढू शकतो. जे हृदय रोगात सूज येण्याचं कारण बनू शकते.

ब्रिस्टल विश्वविद्यालयातील तज्ज्ञांनुसार, जर बॅक्टेरिया ब्लडमध्ये गेले तर ते प्लेटलेट्ससोबत मिळून रक्ताच्या गाठी तयार करू शकतात. जर या रक्ताच्या गाठी हृदयापर्यंत पोहोचल्या तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचाही धोका आहे. 

फ्लॉसिंगमुळे प्रजनन क्षमताही वाढते. जे पुरूष आणि महिला दोघांच्याही फायद्याचं आहे. २०११ मध्ये स्वीडनमधील एका एक्सपर्टला आढळलं होतं की, ज्या महिलांना हिरड्यांचा आजार नव्हता, त्यांच्या तुलनेत ज्यांना हिरड्यांची समस्या होती त्यांनी गर्भधारणा करण्यासाठी मेहनत करावी लागली.
 

Web Title: Morning routine flossing can reduce risk of killer diseases, Dementia, heart disease, blood clots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.