कोवळं उन म्हणजे आरोग्यासाठी वरदान, होतात इतके फायदे की रोज सकाळी बाहेर पडाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 03:31 PM2021-11-28T15:31:06+5:302021-11-28T15:33:55+5:30
सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये जीवनसत्त्व डी भरपूर प्रमाणात असते, असे असंख्य आरोग्यदायी गुण असलेल्या या कोवळ्या उनात त्वचाविकार बरे करणारे गुणधर्मही आहेत. वाचा सविस्तर…
सकाळचे कोवळे ऊन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. या उनात फक्त अर्धा तास बसल्याने शरीराला ऊब मिळून हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकारक्षमता वाढते शिवाय पांढऱ्या पेशींची संख्या वाढायला मदत होते.
शरीरात आजार निर्माण करणाऱ्या विषाणूंशी लढण्यासाठी कोवळ्या उनात बसल्यामुळे ताकद मिळते. सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये जीवनसत्त्व डी भरपूर प्रमाणात असते, असे असंख्य आरोग्यदायी गुण असलेल्या या कोवळ्या उनात त्वचाविकार बरे करणारे गुणधर्मही आहेत. वाचा सविस्तर…
-दररोज सकाळी सूर्याचे कोवळ्या उनात बसल्याने रक्तप्रवाह वाढतो. याचा परिणाम त्वचेवर होऊन त्वचा उजळ आणि चमकदार व्हायला मदत होते.
-ज्यांना हार्मोनल एक्नेची समस्या आहे त्यांनी कोवळे ऊन अंगावर घ्यावे. यामुळे त्वचेवरील मुरुम, पुटकुळ्या यासारखे त्रासही दूर होतात.
-एक्जिमा या त्वचाविकाराने हैराण झालेल्यांकरिता कोवळे ऊन खूपच गुणकारी आहे. या त्रासापासून सुटका होण्यासाठी दररोज अर्धा तास कोवळ्या उनात बसल्याने एक्जिमासारखे त्वचाविकार बरे होतात. सूर्यकिरणामध्ये अल्ट्रा वायलेट किरणे असतात. या किरणांमुळे त्वचेचे आजार बरे व्हायला मदत होते.
-रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कोवळ्या सूर्यकिरणांमुळे वाढते. त्वचेतील ताजेपणा वाढून चमकही वाढते. यामुळे त्वचेचा पोत सुधारायला मदत होते.