डासांना पळवण्यासाठी मॉस्किटो कॉइल लावता? जाणून घ्या याचे साइड इफेक्ट...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 12:50 PM2024-10-03T12:50:05+5:302024-10-03T12:51:12+5:30
Mosquito Coil Side Effects : अनेक हेल्थ एक्सपर्ट असं मानतात की, एका मॉस्किटो कॉइलमधून जेवढा धूर निघतो, तो अनेक सिगारेटीमधून निघणाऱ्या धुरा इतका असतो.
Mosquito Coil Side Effects : घरात डास वाढले की, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया या आजारांचा धोका वाढतो. अशात जास्तीत जास्त लोक घरातील डास पळवून लावण्यासाठी घरात मॉस्किटो कॉइलचा वापर करतात. यातून निघणारा धूर भलेही डासांना पळवून लावत असला तरी हा धूर आपल्या आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असतो.
धुराने बिघडतं आरोग्य
अनेक हेल्थ एक्सपर्ट असं मानतात की, एका मॉस्किटो कॉइलमधून जेवढा धूर निघतो, तो अनेक सिगारेटीमधून निघणाऱ्या धुरा इतका असतो. या कॉइलमध्ये अनेक केमिकल्स असतात जे आपल्या फुप्फुसांमध्ये शिरतात. ज्यामुळे फुप्फुसांचं नुकसान होतं. याने तुम्हाला भविष्यात श्वास घेण्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ज्यात दम्याचाही समावेश आहे. अनेकांना या धुरामुळे त्वचेसंबंधी एलर्जी देखील होते. हा विषारी धूर आपल्या मेंदुचं देखील नुकसान करतो.
पर्यावरणासाठी घातक
मॉस्किटो कॉइलचा वाईट प्रभाव पर्यावरणावर देखील पडतो. या विषारी धुरामुळे हवा दुषित होते. जेव्हा आपण याला हात लावतो तेव्हा यातील अनेक विषारी तत्व शरीरात जातात. आपण हात धुतल्यानंतर पाण्याच्या माध्यमातून यातील विषारी तत्व काही जीव जंतुमध्ये शिरतात.
डास पळवण्यासाठी नॅचरल उपाय
कापराचा धूर
कापराचा वापर तुम्ही घरातील कीटक किंवा डास पळवण्यासाठी करू शकता. यासाठी तुम्ही २ ते ३ कापराच्या वड्या जाळून रूममध्ये ठेवा. यानंतर रूम थोडावेळ बंद ठेवा. जेव्हा कापूर पूर्णपणे जळेल तेव्हा रूमचा दरवाजा उघडा. कापराच्या सुगंधाने डास तुमच्या रूममधून बाहेर पडतील.
कडूलिंबाच्या पानांचा धूर
कडूलिंब हा एक चांगला आयुर्वेदिक उपाय मानला जातो. जर तुमच्या घरात डास झाले असतील तर तुम्ही कडूलिंबाच्या हिरव्या पानांचा धूर करू शकता. ही पाने जाळू नये त्यांना थोडं पेटवून धूर करा. त्यातून केवळ धूर निघावा. बघता बघता घरातील सगळे डास काही वेळात बाहेर पडतील.
लसणाच्या पेस्टचा वापर
लसणाचा सुगंध जरा उग्र असतो. हा सुगंध डासांना सहन होत नाही. सामान्यपणे जिथे लसूण ठेवलेलं असतं तिथे डास येत नाहीत. जर तुमच्या घरात जास्त डास झाले असतील तर लसणाची पेस्ट तयार करा. रूममधील काही कोपऱ्यात ती ठेवा. डास लगेच पळतील.
पदीन्याचा रस फायदेशीर
तसा तर पदीन्याचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यासोबतच पदीन्याचा वापर वेगवेगळ्या रोगांसाठीही केला जातो. याच पदीन्याच रोप तुम्ही घरात लावल्यास डासांपासून सुटका मिळवू शकता.