डासांमुळे हैराण झाले आहात? या नैसर्गिक उपायांनी मिळवा डासांपासून सुटका...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 01:29 PM2022-09-10T13:29:55+5:302022-09-10T13:30:08+5:30

Mosquitoes Prevention Remedies: आज आम्ही तुम्हाला डासांना घराबाहेर हाकलण्याचे काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय स्वस्त आणि उपयोगी आहेत. याच्या योग्य वापराने कोणते साइड इफेक्टही होत नाही. चला जाणून घेऊ डासांना पळवण्याचे उपाय.

Mosquitoes prevention home remedies, know full detail here | डासांमुळे हैराण झाले आहात? या नैसर्गिक उपायांनी मिळवा डासांपासून सुटका...

डासांमुळे हैराण झाले आहात? या नैसर्गिक उपायांनी मिळवा डासांपासून सुटका...

googlenewsNext

Mosquitoes Prevention Remedies: मान्सून आता संपण्याकडे वाटचाल करत आहे. याच काळात डासांचा त्रास जास्त वाढतो. जर तुम्हीही डासांमुळे हैराण झाले असाल तर जास्त चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला डासांना घराबाहेर हाकलण्याचे काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय स्वस्त आणि उपयोगी आहेत. याच्या योग्य वापराने कोणते साइड इफेक्टही होत नाही. चला जाणून घेऊ डासांना पळवण्याचे उपाय.

रूममध्ये कापूर लावा

कापूर हा कीडे-माकोडे पळवण्यासाठी सर्वात चांगला उपाय मानला जातो. जर तुम्हालाही डासांच्या त्रासापासून सुटका मिळवायची असेल तुम्ही कापराचा वापर करू शकता. तुम्ही 2 ते 3 कापराच्या वड्या जाळून रूममध्ये ठेवा. यानंतर रूम थोडावेळ बंद ठेवा. जेव्हा कापूर पूर्णपणे जळेल तेव्हा रूमचा दरवाजा उघडा. कापराच्या सुगंधाने डास तुमच्या रूममधून बाहेर पडतील.

कडूलिंबाच्या पानांचा धूर

कडूलिंब हा एक चांगला आयुर्वेदिक उपाय मानला जातो. जर तुमच्या घरात डासांनी हल्ला केला असेल तर तुम्ही कडूलिंबाच्या हिरव्या पानांचा धूर करू शकता. ही पाने जळू नये त्यांना थोडं पेटवून धूर करा. त्यातून केवळ धूर निघावा. बघता बघता घरातील सगळे डास काही वेळात बाहेर पडतील. 

लसणाच्या पेस्टचा वापर

लसणाचा सुगंध जरा उग्र असतो. त्यामुळे हा सुगंध डास सहन करू शकत नाहीत. सामान्यपणे जिथे लसूण ठेवलेलं असतं तिथे डास येत नाहीत. जर तुमच्या घरात जास्त डास झाले असतील तर लसणाची पेस्ट तयार करा. रूममधील काही कोपऱ्यात ती ठेवा. डास लगेच पळतील.

पुदीन्याचा रस फायदेशीर

तसा तर पुदीन्याचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यासोबतच पुदीन्याचा वापर वेगवेगळ्या रोगांसाठीही केला जातो. याच पुदीन्याचं रोप तुम्ही घरात लावल्यास डासांपासून सुटका मिळवू शकता.

Web Title: Mosquitoes prevention home remedies, know full detail here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.