COVID symptoms: नखे आणि त्वचेवर कोरोना कशाप्रकारे पसरवतोय इन्फेक्शन, वेळीच घ्या काळजी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 01:37 PM2021-05-08T13:37:59+5:302021-05-08T13:39:19+5:30

तज्ज्ञ सांगत आहेत की, त्वचेवर कोणत्याही प्रकारचा बदल हा कोरोनाचा संकेत असू शकतो. याकडे सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करू नका. असं काही दिसलं तर लगेच डॉक्टरांना संपर्क करा.

Most covid positive patients experience skin infection in second wave | COVID symptoms: नखे आणि त्वचेवर कोरोना कशाप्रकारे पसरवतोय इन्फेक्शन, वेळीच घ्या काळजी...

COVID symptoms: नखे आणि त्वचेवर कोरोना कशाप्रकारे पसरवतोय इन्फेक्शन, वेळीच घ्या काळजी...

googlenewsNext

जसजशी वेळ पुढे जात आहे कोरोनाची नवीन लक्षणे (COVID symptoms) समोर येत आहेत. आतापर्यंत व्हायरस किडनी, लंग्स, जीभ आणि गळ्यावर हल्ला करत होता. मात्र, आता या त्वचेवरही प्रभाव दिसायला सुरूवात झाली आहे. दुसऱ्या लाटेत स्कारिअर लक्षणे समोर आली आहेत. तज्ज्ञ सांगत आहेत की, त्वचेवर (Coronavirus Skin Infection) कोणत्याही प्रकारचा बदल हा कोरोनाचा संकेत असू शकतो. याकडे सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करू नका. असं काही दिसलं तर लगेच डॉक्टरांना संपर्क करा.

गेल्या काही दिवसात ४० टक्के कोविड रूग्णांमध्ये त्वचेत बदल झाल्याचे आढळून आले आहे. यात सर्वातआधी चेहऱ्यावर सूज बघायला मिळते. नव्या रिसर्चमधून इशारा देण्यात आला आहे की, नखांवरही याचे संकेत बघू शकता. स्कीन इन्फेक्शनची लक्षणे असलेल्या कोविड रूग्णांना आधी हलका ताप जाणवला. आज आम्ही तुम्हाला त्वचा संक्रमणाची काही लक्षणे सांगणार आहोत. (हे पण वाचा : Coronavirus : कोरोना आता आपल्यातून कधीच जाणार नाही का? तज्ज्ञांनी दिलेलं उत्तर चिंता वाढवणारं....)

कोरोना व्हायरस एक असा आजार आहे जो त्वचेलाही प्रभावित करू शकतो. याचं कारण कोरोना सर्वातआधी स्किन आणि नंतर म्यूकसमध्ये मेंदूच्या संपर्कात येतो. अनेक रिसर्चमध्ये त्वचेवर दिसणाऱ्या कोरोना व्हायरसच्या लक्षणांचा अभ्यास सुरू आहे. जसे की, चट्टे, जळजळ, डर्मेटायटिस इत्यादी. साबण आणि सॅनिटायजरचा फार जास्त वापर केल्यानेही या समस्या होतात.

ओठांच्या आजूबाजूला कोरडेपणा

तसं तर ओठ कोरडे होणे ही सामान्य बाब आहे. पण जर या दिवसात ओठ जास्तच कोरडे होत असतील तर त्याकडे लक्ष द्या. कारण यालाही संक्रमणाचं नवीन लक्षण मानलं जात आहे. संक्रमणाच्या सुरूवातील ओठ शुष्क होतील आणि ओठांवर स्किन जमा होईल. कमी प्यायल्यानेही ओठ कोरडे होतात. यावर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. (हे पण वाचा : Coronavirus : कधी करावा CT स्कॅन? बघा कोरोना फुप्फुसावर कसा करतो प्रभाव!)

त्वचेवर चट्टे

त्वचेवर चट्टे दिसणे हेही कोरोनाचं लक्षण आहे. यात तुम्हाला वेदनेसोबतच खाजही येऊ शकते. हे तुम्हाला काखेत, मानेच्या मागे, मांड्यांच्या मधे, पायांच्या बोटांच्या मधे बघायला मिळेल. असं सामान्यपणे तेव्हा होतं जेव्हा व्हायरसने धमण्यांवर आणि नसांवर हल्ला केला असेल. कधी कधी शरीरात ऑक्सीजनचा प्रवाह कमी झाल्यावरही त्वचा कोरडी, रखरखीत होते. (हे पण वाचा : CoronaVirus News : कोरोनामुळे फक्त फुफ्फुसालाच धोका नाही, तर रक्ताच्या गुठळ्या सुद्धा होण्याची भीती)

 नखे आणि पायांच्या बोटांवर प्रभाव

नखे आणि पायांच्या बोटांमध्ये काही वेगळं दिसत असेल तर ते कोरोनाचं लक्षण असू शकतं. नखांवर दिसणारा एक विकृत निशाण हे दर्शवतो की, व्यक्तीला आधीच कोविड झाला आहे. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, व्हायरस इन्फेक्शन आणि रिकव्हरी याचा नखांवर नंतर प्रभाव बघायला मिळतो. पायांची बोटांचा रंग निळा पडू शकतो आणि वेदनाही होऊ शकतात.
 

Web Title: Most covid positive patients experience skin infection in second wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.