भय इथले संपत नाही! 'हे' आहेत जगातील सर्वात खतरनाक व्हायरस; लाखो लोकांनी गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 06:35 PM2024-07-20T18:35:18+5:302024-07-20T18:36:32+5:30
व्हायरसमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होते. तसेच लोकांना यामुळे जीव देखील गमवावा लागू शकतो. अशाच काही सर्वात खतरनाक आणि जीवघेण्या व्हायरसबाबत जाणून घेऊया...
जगात विविध प्रकारचे व्हायरस आहेत, त्यापैकी काही अतिशय धोकादायक आहेत. या व्हायरसमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होते. तसेच लोकांना यामुळे जीव देखील गमवावा लागू शकतो. अशाच काही सर्वात खतरनाक आणि जीवघेण्या व्हायरसबाबत जाणून घेऊया...
इबोला व्हायरस
जगातील सर्वात खतरनाक व्हायरसपैकी एक म्हणजे इबोला व्हायरस. जो १९७६ मध्ये पसरला आणि ५० ते ६० टक्के लोकांचा मृत्यू झाला. हा व्हायरस प्राण्यांपासून माणसांमध्ये आला आहे. २०१४ मध्ये आफ्रिकेतील अनेक भागात तो पसरला. एवढेच नाही तर हा व्हायरस आजही लोकांवर अटॅक करतो.
हंता व्हायरस
हंता व्हायरस हा दुसरा सर्वात धोकादायक व्हायरस आहे. एक अमेरिकन तरुण आणि त्याच्या पत्नीला या व्हायरसची लागण झाली, त्यानंतर काही दिवसांनी दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्या दोघांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांतच अमेरिकेतील ६०० हून अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली. मिळालेल्या माहितीनुसार, हा आजार उंदरांमुळे पसरतो.
डेंग्यू
डेंग्यू हा देखील एक प्रकारचा व्हायरस आहे, जो डास चावल्यावर पसरतो. १९५० मध्ये तो पहिल्यांदा फिलीपिन्स आणि थायलंडमध्ये पसरला. त्यानंतर तो जगभर पसरला आणि कोट्यवधी लोक आजारी पडले. एवढेच नाही तर आजही अनेक लोक याला बळी पडतात.
रोटा व्हायरस
मुलांमध्ये वेगाने पसरणारा रोटा व्हायरस हा जगातील सर्वात धोकादायक व्हायरस आहे. त्यामुळे मुलांना जुलाब, न्यूमोनियाचा त्रास होतो. रिपोर्टनुसार, या व्हायरसमुळे दरवर्षी ४ लाख मुलांचा मृत्यू होतो.
स्मॉलपॉक्स व्हायरस
स्मॉलपॉक्स व्हायरस हा जगातील सर्वात धोकादायक व्हायरसपैकी एक आहे. उदाहरणार्थ, जर तीन लोकांना या व्हायरसची लागण झाली, तर त्यापैकी एकाचा मृत्यू निश्चित आहे. त्यामुळे त्याचीही धोकादायक व्हायरसमध्ये गणना झाली आहे.
रेबीज
रेबीजबाबत सर्वांनाच माहीत आहे. मात्र याबद्दल सर्वप्रथम १९२० मध्ये माहिती मिळाली. हा श्वानांमुळे होतो. ज्यामुळे लोकांना जीव देखील गमवावा लागू शकतो.
मारबर्ग व्हायरस
मारबर्ग व्हायरस हा देखील जगातील धोकादायक व्हायरसपैकी एक आहे. १९६७ मध्ये याचा शोध लागला. या आजारामुळे लोकांना खूप ताप येतो आणि शरीराच्या आतील अवयवातून रक्त येऊ लागते. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हायरस माकडांकडून माणसांमध्ये आला आहे.