पायांमध्ये असतं दुसरं 'हृदय', जास्तीत जास्त लोकांना नसतं माहीत याचं कार्य; आता जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 10:24 AM2024-11-18T10:24:18+5:302024-11-18T10:24:45+5:30

पायाच्या पोटऱ्यांमध्ये शरीरातील दुसरं हृदय असतं. सॉलियस स्नायूंना दुसरं हृदय म्हटलं जातं. हार्ट अटॅक किंवा कोणत्याही आजारापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला हे दुसरं हृदय हेल्दी ठेवावं लागतं. 

Most people dont know that calf muscles is called second heart of body | पायांमध्ये असतं दुसरं 'हृदय', जास्तीत जास्त लोकांना नसतं माहीत याचं कार्य; आता जाणून घ्या!

पायांमध्ये असतं दुसरं 'हृदय', जास्तीत जास्त लोकांना नसतं माहीत याचं कार्य; आता जाणून घ्या!

सामान्यपणे सगळ्यांनाच हे माहीत आहे की, शरीरात एक हृदय असतं. जे छातीत असतं आणि रक्त पंप करण्याचं काम करतं. हृदयाद्वारे रक्त संपूर्ण शरीरात पोहोचवलं जातं. मात्र, शरीरात आणखी एक 'हृदय' असतं. पण त्याबाबत फार कमी लोकांना माहीत असतं. एक्सपर्टनुसार, पायाच्या पोटऱ्यांमध्ये शरीरातील दुसरं हृदय असतं. सॉलियस स्नायूंना दुसरं हृदय म्हटलं जातं. हार्ट अटॅक किंवा कोणत्याही आजारापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला हे दुसरं हृदय हेल्दी ठेवावं लागतं. 

पोटऱ्या म्हणजे दुसरं हृदय

छातीतील हृदय रक्त पायांकडे पाठवतं. पण पायांच्या वर रक्त पोटऱ्यांमधील स्नायूंद्वारे फेकलं जातं. या कार्यामुळेच याला शरीरातील दुसरं हृदय म्हटलं जातं. पण ही क्रिया कशी होते हे तुम्हाला माहीत नसेल. 

आकुंचन पावल्यावर पंप करतं

रिसर्चगेटनुसार, शरीराची रचना अशी आहे की, जेव्हा पोटऱ्या आकुंचन पावतात, तेव्हा त्या रक्त परत वरच्या भागाकडे फेकतात. तुम्ही जितके वेळेस उभे राहता किंवा चालता तेव्हा पोटऱ्या आकुंचन पावतात आणि नंतर रिलॅक्स होतात.

हार्ट अटॅकपासून बचाव

जेव्हा पोटऱ्या हेल्दी राहतात आणि वेळोवेळी आकुंचन पावतात तेव्हा रक्त आरामात हृदयापर्यंत पोहोचतं. यामुळे हृदयाला जास्त मेहनत करावी लागत नाही आणि त्यावर जास्त दबावही पडत नाही. प्रेशर कमी झाल्याने हृदय चांगलं काम करतं आणि मसल्स हेल्दी राहतात. आरामात रक्त पोहोचत असल्याने हार्ट अटॅक, हार्ट फेलिअर किंवा हार्ट डिजीजचा धोका कमी राहतो.

पोटऱ्या कसं करतात काम?

चालल्याने किंवा उभे राहिल्याने पोटऱ्या रक्त पंप करतात. त्यामुळे हृदयरोग किंवा हार्ट अटॅकचा धोका कमी राहतो. याच कारणाने एक्सपर्ट नियमितपणे चालण्याचा सल्ला देतात. जेणेकरून ब्लड सर्कुलेशन सुरळीत रहातं आणि हृदयावर दबाव पडू नये.

बसून राहिल्याने होते समस्या

जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसून राहता तेव्हा पोटऱ्या रिलॅक्स होतात. यादरम्यान त्या ब्लड पंप करत नाहीत. ज्यामुळे पायांमध्ये वेदना, सूज किंवा रक्त गोठण्याची समस्या होऊ शकते. याचा हृदयावरही प्रभाव पडतो.

केवळ एक्सरसाईज पुरेशी नाही

जर तुम्ही विचार करत असाल की, दिवसातून एक तास एक्सरसाईज करणं पुरेसं आहे. तर तुम्ही चुकीचा विचार करताय. तुम्ही दिवसभर वेळोवेळी पायांचा वापर केला पाहिजे. ज्यामुळे दिवसभर हृदयाला आराम मिळतो. प्रयत्न करा की, एकाच जागेवर एकसारखं अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ बसू नये.

Web Title: Most people dont know that calf muscles is called second heart of body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.