न्यू वर्ल्ड सिंड्रोमच्या जाळ्यात देश, ७५ टक्के लोकं या आजाराने ग्रस्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 12:24 PM2018-08-16T12:24:49+5:302018-08-16T12:27:10+5:30
स्पर्धा आणि कामाचा वाढता ताण यामुळे अनेकांच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे शारीरिक हालचाल कमी आणि मेंदुचे परिश्रम वाढतात. हे सुद्धा न्यू वर्ल्ड सिंड्रोमचं कारण बनलं आहे.
देशातील लोकसंख्येचा एक मोठा भाग न्यू वर्ल्ड सिंड्रोम या आजाराने ग्रस्त आहे. न्यू वर्ल्ड सिंड्रोम हा आजार सिंड्रोम किटाणू किंवा कशाप्रकारच्या संक्रमणाने होणारा आजार नाह तर लाइफस्टाइल आणि आहार संबंधी सवयींमुळे होतो. न्यू वर्ल्ड सिंड्रोमने ग्रस्त लोक हे जाडेपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग इत्यादी आजारांनी ग्रस्त असतात. हैदराबादच्या सनशाइन रुग्णालयाचे बरिअॅट्रीक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. वेणुगोपाल पारीक म्हणाले की, न्यू वर्ल्ड सिंड्रोम पारंपारिक आहार आणि लाइफस्टाइलमध्ये झालेल्या बदलांमुळे होणारा आजार आहे.
न्यू वर्ल्ड सिंड्रोमसाठी पाश्चिमात्य पद्धतीचा आहार खासकरुन जबाबदार आहे. हे सर्वच खाद्य पदार्थ शरीरात जमा होतात आणि त्याने जाडेपणा वाढतो. जाडेपणामुळेच मधुमेह मेलिटस, उच्च रक्तदाब, ब्रेस्ट कॅन्सर आणि डिस्प्लिडेमिया असे आजार होतात. भारतातील ७० टक्के शहरी लोकसंख्या जाडेपणा किंवा जास्त वजन असलेल्या श्रेणीत येते. वर्ल्ड हेल्थ संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतात साधारण २० टक्के शाळेत जाणारी मुले जाडेपणाने ग्रस्त असतात.
स्पर्धा आणि कामाचा वाढता ताण यामुळे अनेकांच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे शारीरिक हालचाल कमी आणि मेंदुचे परिश्रम वाढतात. हे सुद्धा न्यू वर्ल्ड सिंड्रोमचं कारण बनलं आहे.
शरीराचं वजन सामान्यापेक्षा अधिक झाल्यास मधुमेह होण्याची धोका अधिक वाढतो. मधुमेहामुळे हाय ब्लड प्रेशर, हृदय विकाराचा झटका, मेंदुमध्ये स्ट्रोक, डोळ्यांची दृष्टी जाणे, किडनी निकामी होणे अशा गंभीर समस्या होऊ शकतात. जास्त वजन असलेल्या लोकांना स्लीप एपनिया हा गंभीर आजार होऊ शकतो. हा एक श्वासासंबंधी आजार आहे. ज्यात झोपेत श्वास घेण्याची प्रक्रिया थांबते.
वजन जास्त असलेल्या लोकांना सांधीवाताची समस्याही होऊ शकते. याने गुडघे अधिक प्रभावित होतात. यामुळे रुग्णात युरीक अॅसिडचं प्रमाण वाढतं. याचकारणे सांधेदुखी आणि सूज येणे या समस्या होतात. वजन वाढलेल्या शरीरात मांस वाढल्याने ट्रायग्लिसराइड्स आणि खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. कोलेस्ट्रॉल वाढल्याने किंवा अधिक कमी झाल्याने एथेरोस्क्लेरोसिस नावाचा आजार होऊ शकतो. याने रक्तवाहिन्या ब्लॉक होता आणि हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. त्यासोबतच जाडेपणामुळे व्यक्तीला कॅन्सर होण्याचाही धोका असतो. यात आतडे, ब्रेस्ट आणि ओसोफेंजिअल कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते.