3 मुलांच्या आईने बाळंतपणानंतर असं घटवलं वजन; जाणून घ्या तिचा डाएट प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 12:37 PM2019-09-02T12:37:35+5:302019-09-02T12:43:29+5:30
गरोदरपणात महिलांचं वजन वाढतं, तसेच त्यांच्या शरीराचा आकारही बदलतो. एवढचं नाहीतर त्यांना आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो. असाच काहीसा प्रकार लॉस एन्जॉलिसमध्ये राहणाऱ्या तीन मुलांच्या आईसोबत झालं होतं.
गरोदरपणात महिलांचं वजन वाढतं, तसेच त्यांच्या शरीराचा आकारही बदलतो. एवढचं नाहीतर त्यांना आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो. असाच काहीसा प्रकार लॉस एन्जॉलिसमध्ये राहणाऱ्या तीन मुलांच्या आईसोबत झालं होतं. 31 वर्षांची हेयरस्टाइलिस्ट ब्रियानाचा स्वतःवर असलेला विश्वास आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमुळे तिने आपलं तब्बल तीस किलो वजन कमी केलं आहे. जाणून घेऊया तिने कसं केलं वजन कमी?
onlymyhealth.com ने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रियानाला तीन सुंदर लहान मुलं आहेत. ज्यांचं वय पाच वर्षांपेक्षा कमी आहे. मुलांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना न्हाऊ-माखू घालण्यासाठी तुम्हाला अनेक वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. जेव्ही ब्रियाना तिच्या तिसऱ्या बाळाला जन्म देणार होती, त्यावेळई तिचं वजन तब्बल 27 किलोनी वाढली होतं. त्यानंतर तिने तिचं फक्त 7 किलोंनी कमी झालं होतं.
कसं बदललं आयुष्य?
ब्रियानाने सांगितल्यानुसार, 2018मध्ये मला माझ्या वाढलेल्या वजनाची जाणीव झाली. त्यावेळी मी वजन कमी करण्याचा निश्चय केला. त्याआधी माझ्या डाएटमध्ये पिझ्झा, बर्गर. कपकेक, मिल्कशेक आणि सोडा यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. त्यामुळे तिने वजन कमी करण्यासाठी किटो डाएट घेण्याचा निश्चय केला. पण त्याआधी तिने कोणत्याही प्रकारचं डाएट घेतलं नव्हतं. पण तरिही किटो डाएट ती मनापासून फॉलो करू लागली आणि तिचं वजनही कमी होण्यास सुरुवात झाली.
कसं कमी केलं वजन...?
वजन कमी करण्याचा निश्चय केल्यानंतर ब्रियानाने सर्वात आधी समजून घेतलं की, किती वेगाने वजन कमी केलं जाऊ शकतं? तिने वजन कमी केल्यानंतर किटो डाएटची सुरुवात केल्यानंतर जवळपसा 20 किलोग्रॅम वजन कमी केलं. हा डाएट प्लॅन फॉलो करताना मला सर्वात आधी तिला हे समजण्यास मदत झाली की, कोणत्या प्रकारचे पदार्थ तिचं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतात.
ब्रियाना संपूर्ण दिवसभरात कोणते पदार्थ खाते?
ब्रियाना सांगते की, तिने अनेक किटो रेसिपी शोधून काढल्या आहेत. त्यामध्ये अनेक रेसिपी तिच्यासोबतच घरातील इतर मंडळींसाठीही फायेदशीर ठरतात.
नाश्ता : बुलेटप्रूफ कॉफी
लंच : चिकन किंवा टॅको सलाड
स्नॅक्स : पेपरोनी, पनीर स्लाइस
रात्रीचं जेवण : क्रीम चीज जलेपीनो चिकन बेक
डेझर्ट : कापलेल्या स्ट्रॉबेरीसोबत शुगर फ्री चीजकेक
वजन कमी करण्याचे मंत्र :
ठरलेल्या वेळी जेवण करणं...
किटो डाएट सुरू केल्यानंतर ब्रियानाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, वजन कमी करण्यासाठी सर्वात फायदेशीर ठरलेली गोष्टी म्हणजे, इंटरमिटेंट फास्टिंग (थोड्या-थोड्या वेळाने खाणं) याच आधारावर तिने स्वतःचा डाएट प्लॅन तयार केला आणि तो आमंलात आणला. ती नेहमी दुपारी एक वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत खात असे. यामुळे मला कधीच थकवा आला नाही.
कार्ब्स आणि साखरेवर दिलं लक्ष
ब्रियानाने सांगितलं की, वजन कमी करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला कार्ब आणि शरीरातील साखरेच्या प्रमाणावर लक्षं द्यावं लागेल. यामुळे शरीरात होणारे बदल माल जाणवले असल्याचंही ब्रियाना सांगते. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी महिन्यातून फक्त एकाच दिवशी बाहेर खाणं खाते.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.