तोंडात होणाऱ्या फोडांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या याची कारणं!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 09:22 AM2023-03-18T09:22:31+5:302023-03-18T09:22:52+5:30
Mouth Ulcers Symptoms : हा याचाही संकेत आहे की, लाइफस्टाईलमधील आणि डाएटमधील चुका तुम्हाला महागात पडत आहेत. चला जाणून घेऊ तोंडात येणाऱ्या फोडाची कारणं...
Mouth Ulcers Symptoms Of Serious Diseases : तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, काही लोक त्यांच्या तोंडात होणाऱ्या फोडामुळे म्हणजे अल्सरमुळे नेहमीच वैतागलेले असतात. काही लोकांच्या तोंडात पांढरे फोड होतात, जो याचा संकेत आहे की, तुमच्या शरीरात वेगाने बदल होत आहे. सोबतच याचाही संकेत आहे की, लाइफस्टाईलमधील आणि डाएटमधील चुका तुम्हाला महागात पडत आहेत. चला जाणून घेऊ तोंडात येणाऱ्या फोडाची कारणं...
1) अॅसिडिक फूड्स
अॅसिडिक फूड्स जसे की, गरम पदार्थ किंवा जास्त तेल-मसाले असलेल्या पदार्थांमुळे तोंडात फोडं येऊ शकतात. त्याशिवाय जास्त कोल्ड ड्रिंक पिणं, फास्ट फूड खाणं, जास्त तिखट खाणं आणि गरम मसाल्यांचं सेवन करणं याने पोट अॅसिडिक होतं, ज्यामुळे तोंडात फोडं येतात.
2) स्ट्रेस
स्ट्रेसमुळे तुमच्या तोंडात फोडं येतात. जेव्हा आपण जास्त टेंशन घेतो तेव्हा बॉडी एल्कलाइन होते आणि शरीरात उष्णता वाढते. यामुळे शरीरातील अन्न पचन होत नाही आणि तेच त्वचा आणि टिशूजच्या माध्यमातून बाहेर येऊ लागतं. हे पांढरे फोड तुम्हाला त्रास देऊ लागतात.
3) व्हिटॅमिनची कमतरता
व्हिटॅमिन बी खासकरून व्हिटॅमिन बी12 ची शरीरात कमतरता झाली तर तोंडाला पांढरे फोड येतात. हे तुमच्या जिभ आणि तोंडाच्या वातावरणाला फार सेन्सीटिव्ह बनवतं ज्यामुळे तोंडात पांढरे फोड होतात.