आता माऊथ स्प्रे ने कोरोना नष्ट होणार; २० मिनिटात ९८ टक्क्यांनी कमी होईल विषांणूचा प्रभाव, 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 10:08 AM2020-07-21T10:08:47+5:302020-07-21T10:27:40+5:30

स्वीडिश लाइफ कंपनी एनजायमेटीका कंपनीने दावा केला आहे की हा स्प्रे कोरोना व्हायरसला काही मिनिटात नष्ट करण्यासाठी परिणामकारक ठरेल.

Mouth spray kills coronavirus enzymaticas coldzyme mouth spray can deactivate virus | आता माऊथ स्प्रे ने कोरोना नष्ट होणार; २० मिनिटात ९८ टक्क्यांनी कमी होईल विषांणूचा प्रभाव, 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

आता माऊथ स्प्रे ने कोरोना नष्ट होणार; २० मिनिटात ९८ टक्क्यांनी कमी होईल विषांणूचा प्रभाव, 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

Next

संपूर्ण जगभरातील लोकांना कोरोना व्हायरसच्या माहामारीचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून मृतांची संख्याही वाढत आहे. या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी संपूर्ण जगभरातील देश प्रयत्न करत आहेत. जगभरातील १२० पेक्षा जास्त देशात वेगवेगळ्या प्रकारच्या लसी तयार करण्यासाठी संशोधक प्रयत्न करत आहेत. २१ पेक्षा जास्त लसींचे क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. 

कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. त्यात डेक्सामेथासोन्स, फेबिफ्लू, रेमडीसिवीर या औषधांचा समावेश आहे. आता स्वीडनमधील एका कंपनीने कोरोना व्हायरसला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी माऊथ स्प्रे तयार करण्याचा दावा केला आहे. या स्प्रेच्या वापराने काही वेळातच व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं.

Mouth Spray(File Photo)

सीएनबीसीने दिलेल्या रिपोर्टनुसार स्वीडिश लाइफ कंपनी एनजायमेटीका ने कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी माऊथ स्प्रे तयार केला आहे. कंपनीने दावा केला आहे की हा स्प्रे कोरोना व्हायरसला काही मिनिटात नष्ट करण्यासाठी परिणामकारक ठरेल. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एनजाइमेटिका(Enzymatica) कंपनी ने  २० जुलैच्या  रिसर्चनंतर याबाबतचा अहवाल दिला आहे. या अहवालात कंपनीने दावा केला आहे की या  माऊथ स्प्रेस्प्रेने ९८.३ टक्क्यांनी व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं. हे अध्ययन अमेरिकेतील कंपनी मायक्रोबॅक लॅबोरेटरीज इंक ने केलं आहे.  

कंपनीने केलेल्या दाव्यानुसार या ColdZyme Mouth spray ने २० मिनिटात कोरोना व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं.  तसंच या ओरल स्प्रे ने व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं. याशिवाय सर्दी, खोकला अशा आजारांपासूनही या स्प्रेच्या वापराने दूर राहता येऊ शकतं. कंपनीने या एंजायमेटीक ओरल स्प्रे ला कोलेडजाईम असं नाव दिलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार लॅब टेस्टमध्ये दिसून याले की या ओरल स्प्रेने  माणसाच्या शरीरातील अनेक प्रकारच्या व्हायरसशी लढता येऊ शकतं. स्वीडिश कंपनीने अमेरिकेतील मायक्रोबाक्स लॅबमध्ये आंतरराष्ट्रीय परिक्षणासाठी या स्प्रे चे संशोधन केले आहे. 

फक्त शरीरालाच नाही तर मेंदूलाही नुकसान पोहोचवू शकतात तुमच्या 'या' चुकीच्या सवयी

धोका वाढला! कोरोनापेक्षाही महाभयंकर विषाणू पसरण्याचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' कारण

Web Title: Mouth spray kills coronavirus enzymaticas coldzyme mouth spray can deactivate virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.