तोंडाला पुन्हा पुन्हा फोड येत असल्याने हैराण आहात? एकदा करून बघाच हे घरगुती उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 09:43 AM2022-12-15T09:43:10+5:302022-12-15T09:44:58+5:30
Mouth Ulcer : तोंडाला फोड आला की, काही खाण्याची इच्छाही होत नाही. त्यामुळे व्यक्ती केवळ लिक्विडवर अवलंबून असतो. अशात ही समस्या लगेच दूर करणं फायदेशीर असतं.
Mouth Ulcer Remedies: पोटात गडबड झाली की, नेहमीच तोंडाला फोडं येतात. पचनासंबंधी गडबड दूर करून ही समस्या दूर केली जाते. तोंडाला फोड आला की, काही खाण्याची इच्छाही होत नाही. त्यामुळे व्यक्ती केवळ लिक्विडवर अवलंबून असतो. अशात ही समस्या लगेच दूर करणं फायदेशीर असतं. आज आम्ही ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
जेष्ठमध
जर तोंडात फोड आला असेल तर तुम्ही जेष्ठमध बारीक करून त्यात मध टाका. त्यानंतर ही पेस्ट तुम्ही बोटाने फोडावर लावा. काही वेळातच तुम्हाला आराम मिळणं सुरू होईल.
वेलची-मध असतं फायदेशीर
तोंडात फोड आल्यावर वेलची-मध हा उपाय फायदेशीर ठरतो. याचा वापर करण्यासाठी हिरवी वेलची बारीक करून त्यात थोडं मध टाका आणि मग ते फोडावर लावा. याने तुम्हाला आराम मिळेल. काही वेळ ही पेस्ट लावूनच ठेवा नंतर पाण्याने गुरळा करा. याने वेदना दूर होईल.
हळदीचं पाणी
तोंडाच्या फोडाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हळदीच्या पाण्याचा वापर करू शकता. याचा वापर करण्यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यात 2 चमचे हळद टाकून उकडावी लागेल. नंतर हे पाणी थंड झाल्यावर त्याने गुरळा करा. याने तुम्हाला लगेच आराम मिळेल.
तूपाने मिळेल आराम
तूपाचा उपाय सुद्धा तोंडातील फोडाची समस्या दूर करण्यासाठी गुणकारी मानला जातो. जेव्हा तुम्ही तोंडातील फोडाने हैराण व्हाल तेव्हा त्यावर तूप लावून झोपा. सकाळी उठल्यावर तुम्हाला तोंडातील फोड गायब झालेला दिसेल.
अॅलोवेरा ज्यूसने कमी होतात फोड
तुम्हाला जर तोंडातील फोडाची समस्या दूर करायची असेल तर अॅलोव्हेरा ज्यूसचा वापर करू शकता. यासाठी फोडावर तुम्ही अॅलोव्हेरा ज्यूस लावा. असं केल्याने तुम्हाला लगेच आराम मिळेल. सोबतच फोड येणंही कमी होईल.