कोरोनानंतर आता नवीन व्हायरसची एन्ट्री; लहान मुलांना सर्वाधिक धोका, आतापर्यंत 400 मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 08:03 PM2024-07-24T20:03:14+5:302024-07-24T20:04:13+5:30
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार लहान मुलांना या आजाराचा सर्वाधिक धोका आहे.
Mpox is a Global threat : मंकीपॉक्स विषाणूमुळे होणाऱ्या एमपॉक्स (Mpox) आजाराचा धोका सातत्याने वाढत आहे. सध्या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DCR) मध्ये या आजाराचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आहे. या आजारामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, मुलांना या आजाराचा सर्वाधिक धोका आहे.
MPOX काय आहे?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Mpox हा मंकीपॉक्स विषाणूमुळे होणारा आजार आहे. हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे, जो आजारी व्यक्ती किंवा या विषाणूची लागण झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आल्याने होतो. डॉक्टरांच्या मते, मंकीपॉक्समध्ये कांजण्यासारखी लक्षणे दिसतात आणि संपूर्ण शरीरावर लाल ठिपके येतात. प्रौढांना एमपॉक्सचा धोका 5 टक्के आणि लहान मुलांना 10 टक्के आहे.
आतापर्यंत 400 मृत्यू, WHO चा इशारा
2024 मध्ये आतापर्यंत एकूण 11166 लोकांना 3Mpox ची लागण झाली आहे, त्यापैकी 450 लोकांचा मृत्यू झाला आहे. एका अहवालानुसार, गर्भवती महिलांना या संसर्गाचा धोका असतो. WHO च्या मते हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक व्हायरस आहे. हा लैंगिक संक्रमणाद्वारे पसरत असल्याचेदेखील आढळले आहे. याशिवाय, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा लवकर पसरतो.