छातीत जमा झालेला कफ लगेच येईल बाहेर, एकदा करू बघा हे नॅचलर उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 10:15 AM2024-06-04T10:15:22+5:302024-06-04T10:47:54+5:30
Mucus in lungs: जेव्हा जास्त कफ तयार होतो तेव्हा सायनस, अॅलर्जी, सर्दी किंवा प्रदूषणाचा प्रभाव होतो. चला जाणून घेऊ कफ कसा दूर करायचा.
Mucus in lungs: वातावरणात आता मोठा बदल बघायला मिळत आहे. उष्णता आता जरा कमी होऊन हवेतील गारवा वाढला आहे. काही दिवसांनी मानसून राज्यात दाखल होणार आहे. अशात अनेकांना सर्दी-खोकला आणि कफ होण्याची समस्या होते. अनेकांच्या छातीत कफ जमा होतो. पण तो काही केल्या बाहेर पडत नाही. अशात खोकला आणि इतरही समस्या होतात. झोप लागत नाही. कारण हा कफ रात्री जास्त उमळून येतो. अशात छातीत जमा झालेला हा कफ कसा बाहेर काढावा याचे काही नॅचरल उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जेव्हा अशी समस्या होते तेव्हा नाक आणि छातीत कफ जमा होतो. विंड पाइपमध्ये कफ होणं चांगलंही आहे. कारण तेथील ओलावा टिकून राहतो. पण जेव्हा जास्त कफ तयार होतो तेव्हा सायनस, अॅलर्जी, सर्दी किंवा प्रदूषणाचा प्रभाव होतो. चला जाणून घेऊ कफ कसा दूर करायचा.
खास पाणी प्या
एका भांड्यामध्ये अर्धा कप पाणी घ्या. त्यात १ चमचा गूळ, अर्धा चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा ओवा पावडर, अर्धा चमचा काळे मिरे पावडर आणि अर्धा चमचा काळं मीठ टाका. हे मिश्रण गॅसवर २ मिनिटे गरम करा. हे अर्धा चमचा मिश्रण रोज सकाळी आणि सायंकाळी कोमट पाण्यात टाकून सेवन करा. कोरडा खोकला आणि कफ लगेच दूर होईल.
हळद
हळदीचा तुम्ही कफ दूर करण्यासाठी वापर करू शकता. त्यासाठी तुम्ही हळद वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकता. एकतर तुम्ही कच्च्या हळदीच्या रसाचे काही थेंब घशात टाका आणि काही वेळ तसेच राहू द्या. तसेच तुम्ही हळद कोमट पाण्यात टाकून सेवन करू शकता. याने कफ घसरून जाईल.
तेलाचा वापर करा
जेव्हा छातीत कफ जास्त प्रमाणात जमा होतो तेव्हा तुम्हाला श्वास घेण्यास घेण्यास अडचण येऊ लागते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही नॅचरल तेलांचा वापर करू शकता. कारण यातील अॅंटी-इंफ्लेमेटरी आणि अॅंटी-बॅक्टेरिअल ही समस्या दूर करण्यास मदत करतात. तुम्ही रात्री झोपण्याआधी नाकात २ थेंब इसेंशिअल ऑइल टाका. याने सकाळी नाक साफ होईल.
भरपूर पाणी प्या
कफ छातीत जमा झाल्यावर भरपूर पाणी प्यावं. याने शरीर हायड्रेट राहतं. यामुळे कफ कमजोर करण्यास मदत मिळते. या उलट जर शरीरात पाणी कमी असेल तर कफ आणखी घट्ट होतो. ज्यामुळे समस्या जास्त वाढते.
वर्कआउट
फिजिकल अॅक्टिविटी कफ मोकळा करण्यास फार फायदेशीर ठरू शकते. याने शरीरात उष्णता येते आणि कफ कमजोर होऊ लागतो. त्यामुळे पायी चालावे, सायकलिंग करा आणि धावणं फायदेशीर ठरतं.