आरोग्यासाठी हानिकारक आहेत प्रमाणापेक्षा जास्त मल्टी-व्हिटॅमिन्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 11:01 AM2018-11-08T11:01:26+5:302018-11-08T11:02:07+5:30
आरोग्याचा विषय येतो तेव्हा मल्टी-व्हिटॅमिन्सला आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. जेव्हा शरीरात आवश्यक तत्व आणि व्हिटॅमिन्सची कमतरता असेल, तेव्हा मल्टी-व्हिटॅमिन्स माध्यामातून ही कमतरता पूर्ण केली जाते.
आरोग्याचा विषय येतो तेव्हा मल्टी-व्हिटॅमिन्सला आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. जेव्हा शरीरात आवश्यक तत्व आणि व्हिटॅमिन्सची कमतरता असेल, तेव्हा मल्टी-व्हिटॅमिन्स माध्यामातून ही कमतरता पूर्ण केली जाते. पण आता एका रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, मल्टी-व्हिटॅमिन्समुळे हृदयासंबंधी आजारांचा धोका वाढतो.
जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या शोधानुसार, जेव्हा हृदयासंबंधी आजारांना दूर करण्याचा विषय येतो, तेव्हा एकतर औषधांचा प्रभाव कमी होतो किंवा ते निरुपयोगी ठरतात. तसेच काही हृदयासंबंधी आजारांचा धोकाही वाढतो.
डॉक्टरांचं मत आहे की, या निष्कर्षांचा भारतावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडणार आहे. कारण गेल्या काही वर्षात भारतात हेल्थ सप्लिमेंटचा वापर अनेक टक्क्यांनी वाढला आहे. इथे एकतर स्वत:च्या मनाने हेल्थ सप्लिमेंट घेतात नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतात.
२०१२ मधील एका आकडेवारीनुसार, अमेरिकेत ५२ टक्के लोकसंख्या सप्लिमेंट घेतात. ३१ टक्के लोकसंख्या मल्टी-व्हिटॅमिन घेतात तर १९ टक्के लोक हे व्हिटॅमिन डी, तसेच १४ टक्के लोक कॅल्शिअम आणि १२ टक्के लोक व्हिटॅमिन सी घेतात.
कॅन्सर आणि न्यूट्रिशनबाबत माहितीवर अभ्यास करणारी यूरोपियन प्रॉस्पेक्टिव इन्वेस्टिगेशन कंपनीच्या आकडेवारीनुसार, ही बाब समोर आली आहे की, तेथील लोकही सप्लिमेंट घेतात. जसे की, डेनमार्कमध्ये ५१ टक्के पुरुष तर ६६ टक्के महिला सप्लिमेंटचं सेवन करतात.
तज्ज्ञ सांगतात की, सप्लिमेंट सहजपणे मेडिकल स्टोर किंवा केमिस्ट काऊंटरवर मिळतात आणि भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे लोकांना वाटतं की, हे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या लोकांच्या याच भावनांचा फायदा घेतात. लोकांना विश्वास दिला जातो की, जर त्यांनी मल्टी-व्हिटॅमिन्स घेतले तर त्यांना थकवा जाणवणार नाही आणि ते फिट राहतील. रिपोर्ट्सनुसार, भारतात nutraceutical industry म्हणजे हेल्थ सप्लिमेंट तयार करणाऱ्या इंडस्ट्रीचा बिझनेस साधारण २.२ मिलियन डॉलरचा आहे.