मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शन, अत्यंत गंभीर आजार...जाणून घ्या लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 08:38 PM2021-06-16T20:38:00+5:302021-06-16T20:38:42+5:30
जेव्हा शरीरातील दोन पेक्षा अधिक अवयव निकामी होतात तेव्हा त्याला मल्टिपल ऑर्गन डिकफंक्शन म्हणतात. अशा प्रकारचा आजार हा अत्यंत वेदनादायी असतो आणि यात मृत्यूचा धोकाही असू शकतो.
सध्याच्या जीवनशैलीमुळे अनेक समस्या वाढीस लागल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर. जेव्हा शरीरातील दोन पेक्षा अधिक अवयव निकामी होतात तेव्हा त्याला मल्टिपल ऑर्गन डिकफंक्शन म्हणतात. अशा प्रकारचा आजार हा अत्यंत वेदनादायी असतो आणि यात मृत्यूचा धोकाही असू शकतो. जाणून घ्या मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शन कशामुळे होतो.
मल्टीपल ऑर्डर डिसफंक्शनची कारणे
तुमच्या शरीराला झालेला मोठा आजार किंवा अवयवांना आलेली सुज यामुळे अशी स्थीती उद्भवू शकते. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.
मल्टीपल ऑर्डर डिसफंक्शनची लक्षणे
यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळा येतो. शरीरातील आतील भागांना सुज येऊ शकते. रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात. यामुळे शरीर थंड वाटू लागते, श्वास घ्यायला त्रास होतो. अंग दुखु लागते. लघवीला होताना त्रास होतो. त्वचा निस्तेज होते.
फुफ्फुसे, हृदय, डोक, रक्त आदी शरीरातील भागांवर या आजाराचा परिणाम दिसू लागतो.
यावरील उपाय
मल्टीपल ऑर्डर डिसफंक्शनवरील नवनवीन संशोधनामुळे हा आजार आटोक्यात यायला मदत होते आहे. जर तुम्हाला वरील लक्षण दिसली तर त्वरित डॉक्टरकडे धाव घ्या. डॉक्टर तुमच्याकडून विविध वैद्यकीय चाचण्या करून घेतील. तसेच तुमच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या आहेत की नाही तेही तपासतील.