कोरोनाचं ३ तिसरं लक्षणं आहे अंगदुखी आणि मासपेशींतील वेदना; 'या' उपायांनी मिळवा आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 11:51 AM2020-08-19T11:51:41+5:302020-08-19T11:59:11+5:30

ताण-तणाव हे अंगदुखीचे एक प्रमुख आणि सामान्य कारण असले तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Muscles pain is a third symptoms of covid-19 easy home remedies for muscles | कोरोनाचं ३ तिसरं लक्षणं आहे अंगदुखी आणि मासपेशींतील वेदना; 'या' उपायांनी मिळवा आराम

कोरोनाचं ३ तिसरं लक्षणं आहे अंगदुखी आणि मासपेशींतील वेदना; 'या' उपायांनी मिळवा आराम

googlenewsNext

कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात कहर केला आहे. सर्दी, खोकला, ताप, उलट्या होणं, थकवा येणं, श्वास घ्यायला त्रास होणं ही कोरोनाची लक्षणं असून अंगदुखी आणि मासपेशींतील वेदनांचा सुद्धा यात समावेश आहे.  अशी लक्षणं उद्भवल्यास कोरोनाचं संक्रमण झाले आहे की इतर आजारांमुळे त्रास होत आहे. याबाबत चाचणी केल्याशिवाय माहिती मिळू शकतं नाही.

आज आम्ही तुम्हाला मासपेशीतील वेदनांवर घरगुती उपचारांनी कसंं नियंत्रण मिळवता येईल याबाबत सांगणार आहोत.  ताप, सांधेदुखीचा त्रास अचानक वाढणे, स्नायूंचे दुखणे, अंगदुखीमुळे झोप कमी होणे, शारिरीक कमजोरी किंवा आजारपणामुळे आलेला थकवा अशा समस्या अनेकदा उद्भवतात. ताण-तणाव हे अंगदुखीचे  एक प्रमुख आणि सामान्य कारण असले तरीही त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. 

तेलानं मालिश

तेलानं मालिश केल्यानं शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. तेलामुळे मासपेशींना गरमी मिळते. यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या तेलाचा वापर करू शकता. नारळाचं तेल असल्यासं उत्तम ठरेल. तेल कोमट गरम  करून मग या तेलानं  मालिश करा. 

आराम करा

मिठाच्या पाण्यात टावेल भिजवून त्याची शरीराला शेक घेतल्यास आराम मिळतो. आल्याचे साल वाटून ते गरम करावे व नंतर सुती कापडात बांधून त्याचा जिथे जिथे वेदना आहे मसाज केल्यास लाभ मिळतो. जर तुम्हाला थकवा आणि अंगदुखी जाणवत असेल तर पुरेशी झोप घेणं हा त्यावरचा उपाय असू शकतो. आराम केल्यानं शरीराला विश्रांती मिळेल. परिणामी अंगदुखीची समस्या दूर होईल. 

बर्फ

वेदना  जाणवचत असलेल्या ठिकाणी बर्फानं शेकल्यास आराम मिळू शकतो. १५ ते २० मिनिटं बर्फाने शेका. याशिवाय दालचीनिचा तुकडा, सुंठीचा तुकडा ,लवंग, गवती चहा पाण्यात एकत्र करून दिवसातून २ वेळा घेतल्यास अंग दुखी कमी होते.

हळदीचे दूध

हळदीचे दुध रोज घेतल्याने सुद्धा अंगदुखी कमी होते. ५ लवंग आणि थोडी मिरे चहा मध्ये टाकून घेतल्यास अंग दुखी कमी होते. झोप उत्तम येण्यासाठी दुहात अश्वगंधा चूर्ण टाकून खडीसाखरे बरोबर घेतल्यास फायदा होतो.  रोज रात्री झोपण्याआधी हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने शरीर चांगले राहते. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतो. तसेच रक्त अधिक पातळ करण्यास मदत करते. शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो.

हे पण वाचा-

चिंताजनक! WHO चा सर्व देशांना इशारा; कोरोना लसीच्या भरवशावर राहू नका, आपापली व्यवस्था पाहा

'या' वयोगटातील लोकांमार्फत वेगानं होतोय कोरोना विषाणूंचा प्रसार; WHO च्या तज्ज्ञांचा इशारा

पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे पसरताहेत जीवघेणे आजार; संसर्ग होण्याआधी स्वतःला 'असं' ठेवा सुरक्षित

Web Title: Muscles pain is a third symptoms of covid-19 easy home remedies for muscles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.