कावीळ झाल्यावर कसा आहार घ्यावा? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 10:53 AM2019-03-29T10:53:14+5:302019-03-29T10:54:48+5:30

नवजात बाळांना कावीळ होणे सामान्य बाब आहे. पण हा आजार कुणालाही होऊ शकते. कावीळ होण्याची वेगवेगळी कारणे आहेत.

Must eat these things in case of jaundice | कावीळ झाल्यावर कसा आहार घ्यावा? जाणून घ्या

कावीळ झाल्यावर कसा आहार घ्यावा? जाणून घ्या

googlenewsNext

(Image Credit : FirstCry Parentin)

नवजात बाळांना कावीळ होणे सामान्य बाब आहे. पण हा आजार कुणालाही होऊ शकते. कावीळ होण्याची वेगवेगळी कारणे आहेत, ज्यातील एक मुख्य कारण म्हणजे लिव्हरवर सूज येणे. आपण जे काही खातो किंवा पितो ते सर्व लिव्हर द्वारे प्रोसेस होतं. या प्रक्रियेदरम्यान शरीरातील वेस्ट आणि इतर विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. पण अनेकदा काही चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे या प्रक्रियेवर वाईट प्रभाव पडोत. ज्यामुळे रक्तात बिलिरूबिन नावाचं वेस्ट प्रॉडक्ट जमा होतं. यामुळेच काविळ होतो. 

सूप आणि ज्यूस

कावीळ झाल्यावर सामान्यपणे जास्त तरल पदार्थांचं सेवन करण्यास सांगितलं जातं. आता पाणी किंवा ओआरएस फार जास्त कुणी सेवन करू शकत नाही. अशावेळी सूप सेवन करा. अनेकजण मांसाहारी सूपही सेवन करतात. यात कॅलरी भरपूर असतात आणि याने शरीराला पोषक तत्त्व मिळतात. 

नारळाचं पाणी

नारळाच्या पाण्यात असे अनेक पोषक तत्व असतात ज्यामुळे शरीराला वेगवेगळे फायदे होतात. यात अँटी-ऑक्सिडेंट असतात जे फ्री रॅडिकल्ससोबत लढण्यास मदत करतात. या फ्रि रॅडिकल्समुळेच शरीराची सिस्टीम खराब होते. 

प्रोटीन

प्रोटीन मसल्स आणि टिशूज रिपेअर करण्यास मदत होते आणि नव्या टिशूजची निर्मिती होते. त्यामुळे काविळ झालेली असताना प्रोटीनचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. प्रोटीन रिच फूडमध्ये अमिनो अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे लिव्हर मजबूत होतं. त्यामुळे काविळ झाल्यावर डाळी भरपूर खाव्यात. 

पाणी

कावीळ झाला असल्याने पाणी भरपूर पिण्याचा सल्ला दिला जातो. याने केवळ शरीर हायड्रेट राहणार नाही तर शरीरातील विषारी तत्वही बाहेर पडतात. 

फायबर्स

कावीळ झाला असल्यास या स्थितीमध्ये तुमच्या आहारात फॅट सॉल्यूबल फायबर भरपूर प्रमाणात घ्या, कारण हे सहजपणे पचतात. डायटरी फायबर्सचं देखील अधिक सेवन करा याने शरीरातील विषारी तत्त्व बाहेर पडतात. त्यासाठी आहारात बदाम, बेरी आणि ब्राऊन राइसचा समावेश करा. 

व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स 

व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीरात इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स ठेवण्यास मदत करतात. सोबतच लिव्हरची प्रक्रिया सुधारण्यासही मदत करतात. त्यामुळे आहारात एवोकाडो, मटार, टोमॅटो, लिंबू आणि द्राक्षांचा समावेश करा. 

(टिप - कावीळ झाला असल्यास वर सांगितल्या गेलेल्या गोष्टींसोबतच डॉक्टरांसोबतही आहारासंबंधी बोला. त्यांच्या म्हणण्यानुसार उपचार घ्यावेत.)

Web Title: Must eat these things in case of jaundice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.