मस्ट न्यूज - असंघटित कामगारांना मिळणार दर्जेदार आरोग्य सेवा

By Admin | Published: August 18, 2015 09:37 PM2015-08-18T21:37:05+5:302015-08-18T21:37:05+5:30

मस्ट न्यूज

Must News - Unorganized workers will get quality health care services | मस्ट न्यूज - असंघटित कामगारांना मिळणार दर्जेदार आरोग्य सेवा

मस्ट न्यूज - असंघटित कामगारांना मिळणार दर्जेदार आरोग्य सेवा

googlenewsNext
्ट न्यूज
..........................
फोटो मेलवर आहे....
...........................

कांदिवलीत सुपर स्पेशॅलिटी कामगार रुग्णालय

असंघटित कामगारांना मिळणार दर्जेदार आरोग्य सेवा

मुंबई: संघटित कामगारांच्या बरोबरीनेच असंघटित कामगारांना दर्जेदार आरोग्य सेवा राज्य कामगार योजनेंतर्गत देण्यात येणार आहे. यासाठी असंघटित कामगारांना एकत्रित आणून ती माहिती संकलित करुन केंद्राकडे पाठवण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कांदिवली येथे ३०० खाटांच्या सुपर स्पेशालिटी कामगार विमा रुग्णालयाचे उद्घाटन १७ ऑगस्ट रोजी केंद्रीय कामगार, रोजगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी अंधेरी येथील कामगार विमा रुग्णालयाचे भूमिपूजनही करण्यात आले.
याप्रसंगी फडणवीस म्हणाले, की राज्यात असंघटित कामगारांची संख्या अधिक आहे. या सर्व कामगारांना सरकारच्या सर्व सुविधांचा लाभ मिळावा, त्यापासून कोणीही वंचित राहू नये, याची काळजी घेतली जाईल. नागपूर येथील बुटीबोरी या ठिकाणी २०० खाटांचे कामगार विमा रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी ५ एकर जमीन देण्यात येणार आहे.
केंद्रीय कामगार, रोजगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी कामगार विमा रुग्णालयात सुरु केलेल्या इंद्रधनुष्य अभियान येथे ही राबविले जाणार असल्याचे स्पष्ट केले. १८००११३८३९ हा हेल्पलाईन क्रमांक सुरु केल्याची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांना या हेल्पलाईन क्रमांकावर अपघात विभाग, विशेष बाह्यरुग्ण विभागाविषयीची माहिती उपलब्ध होणार आहे. कामगारांचे रेकॉर्ड्स इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड्च्या माध्यामातून ठेवण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
........................
(चौकट)
कामगार रुग्णालयाची वैशिष्ट्ये
३०० खाटांचे रुग्णालय
सेंट्रलाईज वातानुकुलित यंत्रणा
भूकंपरोधक यंत्रणा
........................

Web Title: Must News - Unorganized workers will get quality health care services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.