हिवाळ्यात रामबाण उपाय ठरतं मोहरीचं तेल, जाणून घ्या कसा करावा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 10:33 AM2022-12-13T10:33:07+5:302022-12-13T10:33:59+5:30

Health Benefits Of Mustard Oil: मोहरीच्या तेलामध्ये MUFA, PUFA, ओमेगा 3 आणि 6 फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ई, मिनरल्स आणि अ‍ॅंटीऑक्सीडेंट भरपूर असतात. तसेच यात मजबूत अ‍ॅंटी माइक्रोबियल गुणही भरपूर असतात.

Mustard oil benefits in winter season, know how to use | हिवाळ्यात रामबाण उपाय ठरतं मोहरीचं तेल, जाणून घ्या कसा करावा वापर

हिवाळ्यात रामबाण उपाय ठरतं मोहरीचं तेल, जाणून घ्या कसा करावा वापर

Next

Health Benefits Of Mustard Oil: मोहरीच्या तेलाला घरातील वृद्ध लोक गुणांचा खजिना मानतात. मोहरीचं तेल हे गरम असतं, अशात हिवाळ्यात याचे अनेक फायदे होऊ शकतात. हिवाळ्यात मोहरीचं तेल अनेक दृष्टीने फायदेशीर ठरू शकतं. मोहरीच्या तेलामध्ये MUFA, PUFA, ओमेगा 3 आणि 6 फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ई, मिनरल्स आणि अ‍ॅंटीऑक्सीडेंट भरपूर असतात. तसेच यात मजबूत अ‍ॅंटी माइक्रोबियल गुणही भरपूर असतात. चला जाणून घेऊ हिवाळ्यात हे तेल कसं फायदेशीर ठरतं.

1) सर्दी-खोकला होईल दू

धूळ, कोरडेपणा आणि कमी तापमानामुळे हिवाळ्यात सर्दी-खोकला सहजपणे होतो. मोहरीचं तेल हे गरम असतं, याने श्वसन मार्गातील अडथळा दूर करण्यास मदत मिळते. तुम्ही झोपताना एक चमचा मोहरीचं तेल छातीवर मालिश करत लावा. याने तुम्हाला आराम मिळेल. बंद नाक मोकळं करण्यासाठी एका भांड्यात उकडत्या पाण्यात मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाका आणि त्याची वाफ घ्या. आणखी एक उपाय म्हणजे एक चमचा गरम मोहरीचं तेल आणि 2-3 बारीक केलेल्या लसणाचं मिक्स केलेलं तेल पायांवर लावा.

2) जॉईंट्सचं दुखणं होईल दूर

हिवाळ्यात हात, खांदे, गुडघ्यांचे जॉइंट्स आणि रक्तवाहिका आकुंचन पावतात. ज्यामुळे वेदना होतात. आपल्या मजबूत अ‍ॅंटी इम्फ्लामेटरी गुणंमुळे मोहरीच्या तेलामुळे रक्त प्रवाहात सुधारणा होते. मोहरीच्या तेलाने नेहमी मालिश केली तर जॉईंट्स आणि मांसपेशीमधील वेदना दूर होते. 

3) खाजही होते दूर

थंड वातावरणामुळे हिवाळ्यात त्वचेवर खाज येण्याची समस्याही होते. त्वचा कोरडी पडते, त्वचेवर भेगा पडतात आणि त्वचा निर्जीव दिसू लागते. मोहरीच्या तेलामध्ये नॅच्युरल मॉइश्चरायजरचा वापर करणं त्वचेसाठी फायदेशीर असतं. यातील व्हिटॅमिन ई मुळे आणि अ‍ॅंटी इम्फ्लामेटरी गुणांमुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते.

4) पायांच्या भेगा करा दूर

हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याची समस्या अनेकांना होते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही मेणबत्तीच्या मेणाचा वापर करू शकता. समान प्रमाणात मोहरीच्या तेलात मेणबत्तीचा मेण टाका. हे गरम करा. हे जरा थंड होऊ द्या आणि नंतर टाचांवरील भेगांवर लावा. त्यानंतर सूती सॉक्स घाला. पायांच्या भेगा दूर होतील.

Web Title: Mustard oil benefits in winter season, know how to use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.