रहस्यमय पद्धतीने वाढत आहेत महिलेचे स्तन, डॉक्टर्सनाही पडलं कोडं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 04:49 PM2019-06-19T16:49:05+5:302019-06-19T16:53:03+5:30
नांच्या वाढत्या आकारामुळे आणि वजनामुळे लॅमला आता कुणाचातरी आधार घेऊन चालावं लागत आहे. तर दुसरीकडे डॉक्टरांना सुद्धा हे लक्षात येत नाहीये ही तिची ही समस्या कशी दूर करावी.
थायलंडला राहणारी ४६ वर्षीय महिला एका विचित्र गोष्टीमुळे हैराण झाली आहे. लॅम फ्रेइसी नुएन येथील एका गावात राहते. गेल्या ९ महिन्यांपासून या महिलेचे स्तन आपोआप अचानक बेढब पद्धतीने वाढू लागले आहेत. स्तनांच्या वाढत्या आकारामुळे आणि वजनामुळे लॅमला आता कुणाचातरी आधार घेऊन चालावं लागत आहे. तर दुसरीकडे डॉक्टरांना सुद्धा हे लक्षात येत नाहीये ही तिची ही समस्या कशी दूर करावी.
ना ट्यूमर ना कॅन्सर
लॅम सांगते की, तिने जेव्हा डॉक्टरांशी संपर्क केला तेव्हा वेगवेगळ्या टेस्ट केल्यात. टेस्ट केल्यावर ना कॅन्सरचं कोणतं लक्षण दिसलं ना ट्यूमरचं. डॉक्टरांसाठी लॅमची ही स्थिती कोडं बनली आहे. लॅम आणि तिच्या परिवाराची आर्थिक स्थिती फार चांगली नाही. त्यामुळे पुढील उपचार करण्यासाठी ती असमर्थ आहे. काही दिवसांपूर्वी तिने लोकांकडे मदत मागितली होती.
३ वर्षांआधी झाली होती जाणीव
स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, लॅमला साधारण ३ वर्षांपूर्वी ही जाणीव झाली होती की तिच्या स्तनांचा आकार वाढतोय. पण त्यावेळी आकार वाढण्याची गती कमी होती. मात्र, गेल्या ८ ते ९ महिन्यात तिच्या स्तनांचा आकार अचानक वाढला.
वजनाने मान आणि मणक्या प्रेशर
लॅम सांगते की, 'माझ्यासाठी माझे दोन्ही स्तन सर्वात मोठी अडचण ठरत आहेत. हे सांभाळण्यासाठी मला मानेला कपडा बांधावा लागतो. चालण्या-फिरण्यात त्रास होतो. यांच्या वजनामुळे मान आणि पाठीचा कणा दुखू लागला आहे. आता तर मी काठीचा आधार घेतल्याशिवाय चालू-फिरूही शकत नाही'.
सर्जरी तर कराचीय पण.....
लॅमने सांगितले की, तिने Phutthachinarat Hospital मध्ये खूप चकरा मारल्या. स्तनांमध्ये ट्यूमरसारखी कोणताही बाब नाही. डॉक्टर्स म्हणतात की, ते सर्जरीच्या माध्यमातून स्तन कापून बाजूला करू शकतात. पण जोपर्यंत ते वाढण्याचं कारण कळत नाही असं करणं चुकीचं ठरेल.
एकीकडे लॅमची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे. तर दुसरीकडे लॅमचा पतीही काही दिवसांपासून आजारी आहे. काही महिन्यांपूर्वी लॅमच्या पतीचा अपघात झाला होता. अजून तो त्यातून बाहेरही आला नाहीये. लॅमच्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांना मदतीसाठी आवाहन केलं आहे. जेणेकरून ती तिच्या समस्या दूर करू शकेल.