दारू पिऊन गाडी चालवत असाल तर वेळीच व्हा सावध, नासाच्या रिसर्चमधून दिला इशारा....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 12:16 PM2020-12-28T12:16:28+5:302020-12-28T12:17:22+5:30
अमेरिकन स्पेस एजन्सी नासा आणि सॅन जोज स्टेट यूनिव्हर्सिटीतील नुकताच रिसर्च सांगतो की, अर्धा कॅन बीअर पिऊन ड्रायव्हिंग करत असाल तर हात आणि डोळ्यांचं संतुलन बिघडू शकतं.
बीअर प्यायल्यानंतर ड्रायव्हिंग करत असाल आणि असं करून तुम्हाला काहीच होत नाही असा तुमचा समज असेल तर वेळीच सावध व्हा. अमेरिकन स्पेस एजन्सी नासा आणि सॅन जोज स्टेट यूनिव्हर्सिटीतील नुकताच रिसर्च सांगतो की, अर्धा कॅन बीअर पिऊन ड्रायव्हिंग करत असाल तर हात आणि डोळ्यांचं संतुलन बिघडू शकतं. रिसर्चमधून अलर्ट करण्यात आलं आहे की, ड्रायव्हिंग किंवा जड मशीनरीवर काम करताना अल्कोहोल नुकसान पोहोचवतं. ही स्थिती धोकादायक असते.
वैज्ञानिकांनुसार, ही बाब याआधीही समोर आली आहे की, ७५ किलोच्या व्यक्तीच्या ब्लडमध्ये अल्कोहोलची लेव्हल २० टक्क्यांनी वाढल्याने डोळे आणि हातातील संतुलन बिघडण्याचा धोका वाढलेला असतो. रिसर्च करणारे टेरेंस टायसन म्हणाले की, हे समजून घेण्यासाठी आम्ही अनेक लोकांवर प्रयोग केलेत.
रिसर्चमध्ये २० वयोगटाच्या अशा तरूणांना सहभागी करून घेतले होते जे दर आठवड्याला १ ते २ ड्रिंक घेत होते. त्यांना अल्कोहोलच्या वेगवेगळ्या प्रमाणाचे ड्रिंक्स पिण्यास देण्यात आले होते. यानंतर त्यांच्या डोळ्यांची हालचाल, पापण्यांची हालचाल आणि ब्लडमध्ये अल्कोहोलचं प्रमाण चेक केलं गेलं.
वैज्ञानिकांनुसार, रिसर्चमधून समोर आहे की, ब्लडमध्ये अल्कोहोलचं प्रमाण वाढल्याने डोळ्यांची मुव्हमेंट बिघडते. त्यामुळे ड्रायव्हिंग करण्याआधी अल्कोहोल अजिबात घेऊ नये.