National Walking Day 2023 : दररोज फक्त 20 मिनिटे चालणे, हृदयविकारासह 'या' समस्या राहतील दूर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 11:38 AM2023-04-05T11:38:50+5:302023-04-05T11:46:10+5:30

National Walking Day 2023 : दरवर्षी 5 एप्रिल रोजी साजरा केला जाणारा हा दिवस 2007 साली अमेरिकन हार्ट असोसिएशनने सुरू केला होता.

national walking day 2023 well being benefits of walking methods and more | National Walking Day 2023 : दररोज फक्त 20 मिनिटे चालणे, हृदयविकारासह 'या' समस्या राहतील दूर 

National Walking Day 2023 : दररोज फक्त 20 मिनिटे चालणे, हृदयविकारासह 'या' समस्या राहतील दूर 

googlenewsNext

नवी दिल्ली : नॅशनल वॉकिंग डे 2023 च्या (National Walking Day 2023) माध्यमातून जगभरातील लोकांना चालण्याबाबत जागरूक केले जाते. चालण्याचे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक फायदेही आहेत. त्यामुळे प्रत्येकाने, मग तो लहान असो वा वृद्ध, दिवसातून किमान 20 मिनिटे चालणे आवश्यक आहे. 

दरवर्षी 5 एप्रिल रोजी साजरा केला जाणारा हा दिवस 2007 साली अमेरिकन हार्ट असोसिएशनने सुरू केला होता. शारीरिक हालचालींद्वारे लोकांना निरोगी राहण्यासाठी जागरूक करणे हा त्याचा उद्देश आहे. चालण्याचे महत्त्व सांगणाऱ्या या खास दिवशी आम्ही तुम्हाला चालण्याचे फायदे सांगणार आहोत. जाणून घ्या, फक्त 20 मिनिटांच्या चालण्याने हृदयविकाराच्या झटक्यासह कोणत्या आरोग्य समस्यांपासून सुटका करू शकता.

पबमेडमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, जर तुम्ही आठवड्यातून 4 तास चालण्यात घालवले तर हृदयविकारासह अनेक आजारांचा धोका कमी होतो. दरम्यान, भारतात हृदयरुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि त्यामुळे दररोज चालणे आवश्यक आहे. रिपोर्टनुसार, चालण्याच्या चांगल्या सवयीमुळे हृदयाच्या समस्यांमुळे हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याचा धोका कमी होतो.

डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या मते, जे लोक रोज चालतात त्यांचा रक्तदाब पातळी नियंत्रणात राहते. दरम्यान, फेरफटका मारल्याने शरीरातील नसांमधील गोठलेल्या चरबीची पातळी कमी होऊ लागते. रक्तप्रवाह बरोबर असताना रक्तदाबाचा त्रास होत नाही. रोज काही मिनिटे चालल्याने शरीर सक्रिय आणि ताजेतवाने वाटते आणि मनही कामात गुंतलेले असते. ज्यांना हेवी वर्कआउट किंवा जिम रूटीन पाळता येत नाही अशा लोकांना हळू चालण्याची सवय लावावी. शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासोबतच त्वचेलाही याचा फायदा होतो, असेही असे म्हटले जाते.
 

Web Title: national walking day 2023 well being benefits of walking methods and more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य