तोंडातील फोडांमुळे काही खाता-पिताना होतो त्रास? लगेच करा हे घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 10:22 AM2024-05-04T10:22:44+5:302024-05-04T10:23:08+5:30
तशी तर ही समस्या होण्याची वेगवेगळी कारणे असतात. पण जास्तीत जास्त केसेसमध्ये ही समस्या खराब पचन संस्था किंवा एखाद्या एलर्जीमुळे होते.
अनेकदा उन्हाळ्यात जास्त उष्णतेमुळे किंवा पोटात वाढलेल्या उष्णतेमुळे जिभेवर फोड येतात. ही समस्या सामान्य असते, पण यामुळे त्रास खूप होतो. जिभेवर फोड एक सामान्य ओरल समस्या आहे. पण याकडे दुर्लक्ष केलं तर समस्या गंभीरही होऊ शकते.
तशी तर ही समस्या होण्याची वेगवेगळी कारणे असतात. पण जास्तीत जास्त केसेसमध्ये ही समस्या खराब पचन संस्था किंवा एखाद्या एलर्जीमुळे होते. यात लोकांना जेवताना, पाणी पिताना खूप त्रास होतो. ही समस्या 7 ते 10 दिवस राहते. पण काही घरगुती उपाय करूनही ही समस्या दूर करता येऊ शकते. तेच उपाय आज आम्ही सांगणार आहोत.
लिंबू आणि मध
नॅशनल इंस्टीटयूट ऑफ हेल्थनुसार, मधात अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात जे हे फोड लवकर दूर करण्यास मदत करतात. मधासोबत लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून या फोडांवर लावा तुम्हाला आराम मिळेल.
मीठ
जिभेवरील फोड दूर करण्यासाठी मीठ एक खूप चांगला उपाय आहे. या फोडांमुळे येणारी सूज आणि वेदना याने कमी होतात. यासाठी तुम्ही एक कप गरम पाण्यात एक चमचा मीठ टाकून या पाण्याने गुरळा करा.
दही
दह्यामध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट गुण असतात. जे जिभेवरील आणि ओठांवरील फोड दूर करू शकतात. नॅचरल प्रोबायोटिक भरपूर असलेल्या दह्याचं सेवन केल्याने पोटाची ही समस्या लगेच दूर होईल आणि फोडही दूर होतील.
लवंग तेल
जिभेवरील फोड लवंग तेलानेही दूर केले जाऊ शकतात. यात यूजेनॉल तत्व असतात जे नॅचरल एनेस्थेटिक रूपाने काम करतात. याने फोड आणि सूज दोन्ही दूर होतात. याच्या वापरासाठी एक कप गरम पाण्यात लवंग तेलाचे 3 ते 4 थेंब टाका आणि गुरळा करा.
पेरूची पाने
पेरूच्या पानांमध्येही अनेक फायदेशीर गुण असतात. यांच्या मदतीने तोंडातील आणि जिभेवरील फोड ठीक करण्यास मदत मिळते. यासाठी एक कप पाण्यात 2 ते 3 पेरूची पाने उकडून घ्या आणि नंतर यांचा माउथ वॉशसारखा वापर करा.