रोजच्या जेवणाची एक फिक्स वेळ नसेल तर होते ही गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 01:31 PM2024-04-30T13:31:11+5:302024-04-30T13:31:36+5:30

पोटाच्या अल्सरला पेप्टिक अल्सरही म्हटलं जातं. यात तुमच्या आतड्या प्रभावित होतात. ही समस्या होण्याची कारणे अनेक असू शकतात.

Natural remedies to treat stomach or peptic ulcer | रोजच्या जेवणाची एक फिक्स वेळ नसेल तर होते ही गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!

रोजच्या जेवणाची एक फिक्स वेळ नसेल तर होते ही गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!

आजकाल लोका वेगवेगळ्या कारणांनी पोटाच्या समस्यांचे शिकार होत आहेत. ज्यात पोटाच्या अल्सरच्या समस्येचाही समावेश आहे. पोटाच्या अल्सरला पेप्टिक अल्सरही म्हटलं जातं. यात तुमच्या आतड्या प्रभावित होतात. ही समस्या होण्याची कारणे अनेक असू शकतात. पण ही समस्या अशा लोकांना जास्त होते जे लोक चुकीच्या वेळेवर जेवतात, जास्त तिखट खातात किंवा जास्त तेलकट आणि मसालेदार खातात.

पोटात घट्ट लिक्विडच्या रूपात म्यूकसचा एक चिकट थर असतो. जो पोटाच्या आतील थराचा हायड्रोक्लोरिक अॅसिडपासून बचाव करतो. पण याने शरीराच्या टिश्यूंचं नुकसानही होतं आणि जेव्हा या दोन्हींचं संतुलन बिघडतं तेव्हा पोटात फोड होतात. ज्यावर वेळीच उपचार केले नाही तर स्थिती गंभीर होऊ शकते. अशात यावर काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हलकं जेवण करा

पोटाच्या अल्सरपासून बचाव करण्यासाठी नेहमी हलकं जेवण करण्याचा प्रयत्न करा. जास्त तिखट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणं टाळा. पचायला सोप्या असतील अशा गोष्टींचं सेवन करा. काही दिवस तुम्ही मुगाच्या डाळीची खिचडी खाऊन समस्या दूर करू शकता.

मेथी

मेथीमधील प्रोटीन आणि निकोटिनिकसारखे गुण पोटाच्या अल्सरवर उपचार करण्यास मदत करतात. यासाठी एक चमचा मेथी एक कप पाण्यात उकडून घ्या. मग ते गाळून त्यात मध टाकून सेवन करा. असं केल्याने काही दिवसात आराम मिळतो.

आवळे

आवळ्याचा मुरांबा पोटाचा अल्सर दूर करण्यासाठी फायदेशीर असतो. यात असलेल्या फोलिक अॅसिड, पोटॅशिअम, फॉस्फोरस, आयर्न आणि मॅग्नेशिअमसारखे पोषक तत्व पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

बडीशेप

बडीशेप पोटासाठी फार फायद्याची असते. पोटाचा अल्सर दूर करण्यासाठी रोज बडीशेपचं पाणी प्यावं. याच्या सेवनाने पोटाचं दुखणं, ब्लोटिंग, गॅस आणि बद्धकोष्ठता या समस्या दूर होतात.

लसूण

कच्चा लसूण खाणंही आरोग्यासाठी फायदेशीर असतो. लसणामध्ये एलिसिन नावाचं तत्व असतं जे पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतं. त्यामुळे याचं सेवन फायदेशीर असतं.
 

Web Title: Natural remedies to treat stomach or peptic ulcer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.