जे बात! शरीरातील कोलेस्ट्रॉल नष्ट करण्याचा सगळ्यात सोपा आणि स्वस्त उपाय, वैज्ञानिकांनी केला दावा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 12:41 PM2023-04-15T12:41:10+5:302023-04-15T12:41:34+5:30

Tips To Reduce Cholesterol : बॅड कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून रोखण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे नियमितपणे एक्सरसाइज करणे आणि फॅट असलेले पदार्थ टाळणे हा आहे.

Natural ways to lower cholesterol according to study betel leaves can reduce bad cholesterol naturally | जे बात! शरीरातील कोलेस्ट्रॉल नष्ट करण्याचा सगळ्यात सोपा आणि स्वस्त उपाय, वैज्ञानिकांनी केला दावा...

जे बात! शरीरातील कोलेस्ट्रॉल नष्ट करण्याचा सगळ्यात सोपा आणि स्वस्त उपाय, वैज्ञानिकांनी केला दावा...

googlenewsNext

Tips To Reduce Cholesterol : कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) वाढणं ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणारा हा बॅड कोलेस्ट्रॉल हृदयरोगांच सगळ्यात मोठं कारण ठरत आहे. हेही सत्य आहे की, जगात सगळ्यात जास्त मृत्यू हृदयरोगाने होतात. म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग, हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि रक्ताशी संबंधीत समस्यांचा धोका वाढतो.

कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे उपाय - 

बॅड कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून रोखण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे नियमितपणे एक्सरसाइज करणे आणि फॅट असलेले पदार्थ टाळणे हा आहे. कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांना आयुष्यभर ते कमी करण्यासाठी औषधं खावी लागतात. जर तुम्हाला औषधं टाळायची असेल तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी घरगुती उपायाच्या स्वरूपात खायचं पान तुम्ही वापरू शकता. कारण याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. चला जाणून घेऊ कसं....

कोलेस्ट्रॉलचं दुश्मन आहे पान

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे एक्सरसाइज करणं आणि हेल्दी डाएट घेणं हा आहे. पण यासाठी काही घरगुती उपायही करू शकता. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक सगळ्यात सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे खायचं पान. NCBI वर प्रकाशित एका रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी सांगितलं की, या हिरव्या पानांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता असते.

पानं कोलेस्ट्रॉल दूर करण्यास फायदेशीर

वैज्ञानिकांना आढळून आलं की, खायच्या पानांमध्ये विषारी पदार्थ दूर करण्याची क्षमता असते. पानं अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटच्या रूपात काम करू शकतात. आपल्या रिसर्चमध्ये त्यांनी पानांच्या अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट अ‍ॅक्टिविटीचं मूल्यांकन केलं. त्यांनी हे जाणून घेतलं की, पानामुळे LDL Cholesterol म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल कमी केलं जाऊ शकतं किंवा नाही. आपल्या रिसर्चमध्ये अभ्यासकांना आढळलं की, खायची पानं LDL कोलेस्ट्रॉलचं ऑक्सीकरण रोखण्यास सक्षम होते आणि मॅक्रोफेजमध्ये लिपिड जमा करण्यास सक्षम होते.

खायची पानं कसं कमी करतात कोलेस्ट्रॉल

खायच्या पानांमध्ये यूजेनॉल आढळतं जे एक नॅच्युरल अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आहे. जे फ्री रॅडिकल्सला नष्ट करतात. यूजेनॉल लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल तयार होण्यास रोखतं आणि आतड्यांमधील लिपिड अवशोषण कमी करतं.

कसं करावं पानाचं सेवन

जास्तीत जास्त लोक पान खाण्याला चुकीची सवय मानतात. आरोग्यासाठी ते नुकसानकारक मानलं जातं. पण मुळात पान खाण्याची लोकांची पद्धतच चुकीची आहे. जी आरोग्यासाठी घातक आहे. कारण जास्तीत जास्त लोक पानामध्ये तंबाखू आणि नशेचे पदार्थ टाकून खातात. या हिरव्या पानांमध्ये वेगवेगळे पोषक तत्व असतात. यांच्या सेवनाची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे केवळ हिरवी पाने चावून खा किंवा यांचा रस प्या. हेच अभ्यासकांनी त्यांच्या रिसर्चमध्ये सांगितलं आहे.

पानातील पोषक तत्व

खायच्या पानामध्ये केवळ अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटच नाही तर शरीरासाठी आवश्यक अनेक पोषक तत्व असतात. यात आयोडीन, पोटॅशिअम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-1, निकोटिनिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, फायबर आणि मिनरल्स इत्यादी तत्व असतात.

Web Title: Natural ways to lower cholesterol according to study betel leaves can reduce bad cholesterol naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.