घरच्याघरी 'हे' योगासन कराल तर पोटाची चरबी होईल नक्की होईल कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 06:31 PM2020-01-19T18:31:30+5:302020-01-19T18:36:33+5:30
फास्टफूडचा आहारातील वाढचा समावेश आणि झोप पूर्ण न होण्यामुले लठ्ठपणा समस्या उद्भवत असते.
फास्टफूडचा आहारातील वाढता समावेश आणि झोप पूर्ण न होण्यामुळे लठ्ठपणा समस्या उद्भवत असते. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करत असतात. काहींना जिमला जायला वेळ नसतो तर काही लोकांना जिमला जायला मुळात आवडतच नाही. अनेक लोकांचं वजन वाढलेलं असतं. त्यामुळे अशा लोकांसाठी आम्ही काही खास घरीच करता येतील अशी योगासनं सांगणार आहोत. यामुळे तुम्ही वजन कमी करू शकता कमी शकता.
योगा करण्यासाठी तु्म्हाला कोणत्याही योगा क्सासला जाण्याची गरज नाही. घरच्याघरी सुद्धा तुम्ही हा व्यायाम करू शकता. योगासनांमधला महत्वपूर्ण प्रकार नौकासन हा आहे. नौकासन पोटावर केले जाणाऱ्या आसनांपैकी एक महत्त्वपूर्ण योगासन आहे. या आसनात शरीराचा आकार बोटीसारखा होतो म्हणून या आसनाला नौकासन म्हटले जाते. हे आसन करण्यासाठी खूप सोपं आहे.( हे पण वाचा-अंगावरून पांढरं पाणी जातंय? असू शकतो गर्भाशयाचा कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)
नौकासन करण्याची पद्धत
सर्व प्रथम पोटावर झोपा. पाय जुळलेले असावे. हात शरीराजवळ असावेत. पूर्ण श्वास सोडावा आणि श्वास घेत दोन्ही हात आणि पाय एकाचवेळी जमिनीपासून 30 अंश वर उचलावे. म्हणजे संपूर्ण शरीराचा बॅलन्स पोटावर आले पाहिजे ह्या स्थितीत थोडे थांबावे आणि सावकाश आसन सोडावे. (हे पण वाचा-हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश नक्की करा)
नौकासनाचे फायदे
वजन कमी होते आणि तुम्ही वजनावर नियंत्रण करून पाहिजे तशी फिगर मिळवू शकता.
अतिरिक्त चरबी घटण्यास सुरूवात होते.
पाठीच्या कण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे.
नियमितपणे या आसनाला केल्यास किडनीच्या आजारांपासून बचाव होतो.
नौकासनामुळे शरीर लवचीक राहते.
नौकासनामुळे पचनासंबंधीच्या अपचन, गॅस, बद्धकोष्ठता अशा पोटाच्या विकारांपासून आराम मिळतो.