Navratri 2018 : नवरात्रीच्या उपवासामुळेही शरीराला होतात 'हे' फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 05:15 PM2018-10-14T17:15:56+5:302018-10-14T17:16:29+5:30
नवरात्रीचं पर्व सुरू असून अनेक लोक देवीची पूजेसोबतच नऊ दिवस उपवास करतात. त्यातील काही लोक 9 दिवस फक्त पाणीचं पितात तर काही लोकं फक्त नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात.
नवरात्रीचं पर्व सुरू असून अनेक लोक देवीची पूजेसोबतच नऊ दिवस उपवास करतात. त्यातील काही लोक 9 दिवस फक्त पाणीच पितात तर काही लोक फक्त नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात. तसं पहायला गेलं तर नवरात्रीच्या उपवासाचं धार्मिक महत्त्व असतंच परंतु उपवास करणं शरीरासाठीही लाभदायक असतं. जाणून घेऊया उपवासाचे शरीराला होणारे फायदे...
1. उपवास केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात. त्याचबरोबर पचनक्रिया सुरळीत होण्यासही मदत होते.
2. उपवासादरम्यान फॅट्स बर्न होण्याचं प्रक्रिया जलद गतीने होते आणि वजन नियंत्रणात आणणं शक्य होतं.
3. शरीरातील फॅट्स सेल्समधून लॅप्टिन नावचं एक हार्मोन स्त्रवलं जातं. उपवासादरम्यान कमी कॅलरीज मिळाल्याने लॅप्टिनची सक्रियतेवर प्रभाव पडतो आणि वजन कमी होते.
4. उपवासादरम्यान काही आवश्यक पोषक तत्व शरीराला मिळणे गरजेचे असतात. शरीराला आवश्यक पोषक तत्व नाही मिळाली तर अशक्तपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासामध्ये किंवा उपवास सोडल्यानंतर तुम्ही जे काही खात असाल ते सर्व पदार्थ पौष्टीक असतील याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. अशावेळी जास्त फॅट्स असलेले पदार्थ खाणं टाळा अन्यथा वजन कमी होण्याऐवजी पटकन वाढण्याची शक्यता अधिक असते.
5. उपवास करण्यामुळे नवीन रोग प्रतिरोधक पेशी तयार होण्यास मदत होते. यूनिवर्सिटी ऑफ साउथ कॅलिफोर्नियातील अभ्यासकांनी सांगितलं की, कॅन्सरच्या रूग्णांसाठी उपवास करणं फायदेशीर ठरतं. खसकरून त्या रूग्णांसाठी जे कीमोथेरपी घेत आहेत.
6. गरजेचं नाही की, एखाद्या सणाला किंवा खास दिवशी उपवास ठेवावा. शरीरातील विषारी पदार्थ साफ करण्यासाठी आणि पचन क्रिया सुधारण्यासाठीही तुम्ही उपवास करू शकता.
7. अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, काही वेळासाठी उपवास केल्याने मेटाबॉलिक रेटमध्ये 3 ते 14 टक्क्यांनी वाढ होते. खरचं असं असेल तर पचनक्रिया आणि कॅलरी बर्न होण्यासाठी मी वेळ लागेल.
8. उपवास केल्याने डोकं शांत राहतं. त्याचप्रमाणे डिप्रेशन आणि मेंदूशी जोडलेल्या अनेक समस्यांपासूनही सुटका होते.
9. उपवासादरम्यान तुम्हाला तुमच्या भूकेचा अंदाज येतो.
10. सध्या तणाव ही एक फार मोठी समस्या आहे. उपवास केल्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.