काळाची गरज! जीवनदान देणाऱ्या लिव्हर ट्रान्सप्लांटबाबतच्या 'या' गोष्टी सर्वांना माहीत असाव्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 10:39 AM2020-01-16T10:39:06+5:302020-01-16T10:43:21+5:30
लिव्हर ट्रान्सप्लांटची स्थिती तेव्हा येते जेव्हा एखाद्या व्यक्तीचं लिव्हर डॅमेज होऊ त्याच्या जीवाला धोका निर्माण होतो.
(Image Credit : quora.com)
लिव्हर ट्रान्सप्लांटची स्थिती तेव्हा येते जेव्हा एखाद्या व्यक्तीचं लिव्हर डॅमेज होऊ त्याच्या जीवाला धोका निर्माण होतो. साधारण लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी लिव्हर अशा व्यक्तीचं घेतलं जातं, ज्याने तो जिवंत असतानाच त्याचं लिव्हर डोनेट केलं आहे. पण यातही दोन स्थिती आहेत.
एकापासून दोन लिव्हर
अनेकदा परिवारातील लोक त्यांच्यातील कुणाचं निधन झालं असेल तर ते त्यांचे अवयव डोनेट करू शकतात. असं केल्यास गरजूंना नवीन जीवन मिळण्यास मदत मिळते. पण खास बाब ही आहे की, आता जिवंत असतानाही डोनर त्यांच्य लिव्हरचा काही भाग डोनेट करू शकतात आणि दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतात. जिवंत असलेल्या डोनरकडून आपल्या लिव्हरचा काही भाग दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी देण्याच्या प्रक्रियेला लिव्हिंग डोन लिव्हर ट्रान्सप्लांट असं म्हणतात.
(Image Credit : singhealth.com.sg)
जगभरात लिव्हरची ट्रान्सप्लांटची गरज असलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. मात्र, डोनरची संख्या फारच कमी आहे. अशात लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट ही वेटींगवर असलेल्यांची संख्या कमी करू शकतील.
स्वत:ला वाचवतो लिव्हर
तज्ज्ञ सांगतात की, लिव्हर एक असा अवयव आहे जो स्वत:ला रिजनरेट करतो. याची हीच खासियत लिव्हिंग डोन लिव्हर ट्रान्सप्लांटला यशस्वी ठरवतात.
किती वेळात पूर्ण होतं लिव्हर?
तज्ज्ञ सांगतात की, जे जिवंत व्यक्ती आपल्या लिव्हरचा काही भाग दुसऱ्या व्यक्तीला डोनेट करतात, त्या व्यक्तीचं लिव्हर केवळ २ महिन्यात पुन्हा विकसितहोतं आणि आपल्या नैसर्गिक आकारात येतं.
इतकेच नाही तर रिसीव्हर म्हणजेच ज्यांच्या शरीरात लिव्हर ट्रान्सप्लांट केलंय, त्यांच्या शरीरात ट्रान्सप्लांट करण्यात आलेल्या लिव्हरचा भाग हळूहळू विकसित होतो आणि काही काळाने नॉर्मल लिव्हरप्रमाणे काम करू लागतं.
जे लोक लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांटच्या प्रक्रियेतून जातात, त्यांच्यात या प्रक्रियेनंतर काही मेडिकल समस्या होऊ शकतात. पण जर एखाद्या मृत डोनरचं लिव्हर ट्रान्सप्लांट केलं तर त्यांना समस्या होत नाहीत.
असं लिव्हर जास्त काळ चालतं
लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांटची सर्वात मोठी खासियत ही आहे की, या प्रक्रियेतून घेण्यात आलेलं लिव्हर मृत व्यक्तींच्या लिव्हरच्या तुलनेत जास्त काळापर्यंत चालू शकतं. खास बाब ही आहे की, लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांटची प्रक्रिया लहान मुलांमध्ये सर्वाधिक वापरली जाते.