चहा चपाती खाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, टेन्शन फ्री राहण्याचा उत्तम मार्ग; सांगतोय खुद्द नीरज चोप्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 07:29 PM2021-09-21T19:29:05+5:302021-09-21T20:33:45+5:30
सध्या नीरज चोप्रा एका सोशल मिडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. यात नीरजने टेन्शन फ्री राहण्याचा उपाय सांगितला आहे. नीरजने सोमवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला, ज्या फोटोमध्ये त्यांने तणावापासून मुक्ती कशी मिळवायची, याचा साधा-सोपा उपाय सांगितला.
टोकिओ ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्राचे देशातच नाही तर परदेशातही त्याचे लाखो चाहते तयार झाले आहेत. नीरज सोशल मीडियावरही चांगलाच अॅक्टिव्ह आहेत. सध्या नीरज त्याच्या एका सोशल मिडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. यात नीरजने टेन्शन फ्री राहण्याचा उपाय सांगितला आहे.
खाओ रोटी पियो चाय, टेंसन को करो बाय बाय 🫓☕️ pic.twitter.com/yTnboE9DOk
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) September 20, 2021
नीरज चोप्राने सोमवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला, ज्या फोटोमध्ये त्यांने तणावापासून मुक्ती कशी मिळवायची, याचा साधा-सोपा उपाय सांगितला. हा उपाय आहे चहा चपाती. होय तुम्ही बरोबर ऐकताय! तुम्ही स्वत:च पाहु शकता की, या फोटोमध्ये नीरजने एका हातात चपाती आणि दुसऱ्या चहाचा ग्लास पकडलेला आहे. नीरज चोप्राने या फोटोवर कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, खाओ रोटी, पिओ चाय, टेंसन को करो बाय-बाय, म्हणजेच चहा प्या, चपाती खाली आणि टेन्शनला बाय बाय करा. नीरजची ही पोस्ट आता व्हायरल झाली आहे. हा फोटो पाहुन नीरजचे चाहते त्याच्या साधेपणावप फिदा झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर लोक हा फोटो लाईक आणि शेअर करतायत. या फोटोवरतर कमेंट्सचा पाऊस पडतोय.
सोबतच शिळी चपाती खाण्याचे फायदे जाणून घेऊ
१. आपण बऱ्याचदा पाहतो की, घरातील पोळी शिळी झाली की, काही लोक कचऱ्यात फेकून देतात.मात्र, पोळी जेव्हा शिळी होते, तेव्हा ती खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. शिळी पोळी खाणं हे तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. त्यामुळे शिळी पोळी टाकून देणं बंद करा. याचा उपयोग तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट म्हणूनदेखील करू शकता.
२. आपल्यापैकी काही व्यक्तींना थोडंसं काम केलं तरी थकायला होतं. अशा व्यक्तींसाठी शिळी पोळी म्हणजे एनर्जी बूस्टरचं काम करते. वास्तविक या पोळीमध्ये कार्बोहायड्रेड्स असतात जे तुमच्या शरीरातील कमतरता पूर्ण करतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला लगेज एनर्जी मिळते आणि तुम्हाला उत्साही वाटतं.
३. शिळी पोळी खाल्ल्यास तुम्हाला पचनक्रियेची कोणतीही समस्या उद्भवत नाही. तुम्हाला पोटासंबंधित कोणताही आजार अर्थात पोटात सतत गॅस निर्माण होणं, पोट फुगणं असं काही जाणवत असेल तर त्यावर शिळी पोळी हा एक रामबाण उपाय आहे. शिळ्या पोळीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे पोटासंबंधित आजार दूर होतात.
४. तुमचं वजन जर खूप वाढत असेल आणि तुम्ही त्यामुळे त्रस्त असाल तर त्यावर शिळी पोळी खाणं हा चांगला पर्याय आहे. शिळी पोळी खाल्ल्याने तुमच्या शरीरातील चरबी कमी व्हायला मदत होते. तसंच तुमचं मेटाबॉलिजम व्यवस्थित राहातं. यामुळे तुमचं तुमच्या भूकेवर नियंत्रण राहून वजनदेखील नियंत्रणात राहातं.
५. शिळ्या पोळीत असणारे प्रोटीन आणि कॅल्शियम हे घटक हाडांना मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. शिळी पोळी खाल्ल्याने तुमची हाडं मजबूत आणि लवचिक राहतात.