लिव्हरसोबत कधीच करू नका ही 5 कामं, दारू न पिताही होईल खराब!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 11:08 AM2024-01-06T11:08:20+5:302024-01-06T11:08:55+5:30
जर तुम्हाला लिव्हर निरोगी ठेवायचं असेल तर काही अनहेल्दी सवयी सोडल्या पाहिजे. कारण केवळ दारूमुळेच धोका आहे असं नाही...
दारू हा शरीरासाठी फार नुकसानकारक पदार्थ आहे. याचं सेवन केल्याने अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीज होऊ शकतो. ज्यात लिव्हर खराब होतं आणि हळूहळू कॅन्सरही होऊ शकतो. पण तुम्हाला माहीत नसेल की, लिव्हर खराब होण्याचं केवळ हेच एक कारण नाही. त्याशिवायही लिव्हर खराब होण्याची काही कारणे आहेत.
न्यूरोलॉजिस्ट आणि हेल्थ एक्सपर्ट डॉ. प्रियंका शेरावत यांनी लिव्हर निरोगी ठेवण्याची पद्धत सांगितली आहे. त्या म्हणाल्या की, जर तुम्हाला लिव्हर निरोगी ठेवायचं असेल तर काही अनहेल्दी सवयी सोडल्या पाहिजे. कारण केवळ दारूमुळेच धोका आहे असं नाही तर या काही सवयीही लिव्हरचं नुकसान करतात.
शुगरवर लक्ष न देणं
इन्सुलिन रेजिस्टेंसमुळे हाय झालेली ब्लड शुगर लिव्हरला खराब करते. यामुळे कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि प्रोटीन पचन थांबतं. हे तत्व लिव्हरच्या सेल्समध्ये जमा होऊ लागतात आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीज होतो.
ब्लड प्रेशर चेक न करणे
हायपरटेंशनमुळे तुमचे डोळे, हृदय, मेंदू, नसा, किडनी आणि लिव्हरला नुकसान पोहोचतं. ब्लड प्रेशर वाढल्याने लिव्हरला रक्त पुरवणाऱ्या नसा आकुंचन पावतात आणि त्याला रक्त मिळू शकत नाही. यानंतर लिव्हरच्या सेल्सचं फंक्शन हळू होतं.
कोलेस्ट्रॉल कंट्रोल न ठेवणं
जर तुमचं लिपिड प्रोफाइल कंट्रोलच्या बाहेर आहे तर फॅटी लिव्हर होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. बॅड कोलेस्ट्रॉल लिव्हरमध्ये जाऊन जमा होतं आणि त्याला फॅटी बनवतं. हळूहळू लिव्हर कमजोर होतं आणि मग शरीरही कमजोर होऊ लागतं.
या 3 चुकाही टाळा
1) डाएटमध्ये व्हिटॅमिन ई आणि फायबरचा समावेश न करणं
2) दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लीटर पाणी न पिणं
3) रोज 30 ते 40 मिनिटे न चालणं