दारूसोबत या 3 गोष्टी खाल्ल्याने वाढतात आणखी समस्या, कशाने डबल नशा तर कशाने होते उलटी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:45 PM2023-11-10T12:45:57+5:302023-11-10T12:46:58+5:30
आम्ही दारू पिण्याचं समर्थन करत नाही, पण काही चुका टाळल्या तर अनेक धोके टळू शकतात.
दारू हे जगातलं सगळ्यात अनहेल्दी ड्रिंक आहे. याचे दुष्परिणाम सगळ्यांनाच माहीत असतात. तरीही लोक याचं सेवन करतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अनेकदा सांगितलं आहे की, दारूच्या एका थेंबानेही अनेक कॅन्सरचा धोका असतो.
पण तरीही काही लोक रोज तर काही लोक पार्ट्यांमध्ये याचं सेवन करतात. अशात लोक अल्कोहोलचं सेवन करतानाही अनेक चुका करतात. आम्ही दारू पिण्याचं समर्थन करत नाही, पण काही चुका टाळल्या तर अनेक धोके टळू शकतात.
एक्सपर्ट सांगतात की, दारू पिताना काही फूड्सचं अजिबात सेवन करू नये. याने दारूची नशा दुप्पट तर होतेच सोबतच उलटी, हाय-लो लिपोप्रोटीन डेंसिटी कोलेस्ट्रॉल, हाय ट्रायग्लिसराइड होऊ शकतो.
फॅटी लिव्हर, हाय ब्लड शुगरचा धोका कमी करण्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टर राजू राम गोयल यांनी दारूसोबत काय खाऊ नये याबाबत सांगितलं आहे.
काजू-शेंगदाणे
डॉक्टरांनी सांगितलं की, दारूसोबत कधीच काजू-शेंगदाणे खाऊ नये. कारण यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल वेगाने वाढते. डायजेस्टिव सिस्टीम खराब होऊ लागतं आणि भूक लागत नाही.
काजूमुळे ब्लोटिंग, बद्धकोष्ठता, वेट गेन, जॉईंट्समध्ये सूज आणि शेंगदाण्यांनी अॅलर्जी, डायरिया, स्कीन इचिंग, चेहऱ्यावर सूज, उलटी होऊ शकते.
गोड पदार्थ
ड्रिंकिंग दरम्यान गोड पदार्थांचं अजिबात सेवन करू नये. आधीतर याने तुमची नशा डबल होते आणि अनेकदा उलटी होण्याचीही शक्यता असते. फार जास्त गोड खाल्ल्याने डायबिटीसचा धोकाही असतो. तसेच किडनी रोग, हृदयरोग आणि नसांच्या रोगासाठीही हे मुख्य कारण ठरू शकतात.
दूध-दही
दूध आणि दही खाणं चांगली सवय आहे. पण दारूसोबत हे विषासारखं काम करतं. यामुळे अॅसिडिटी आणि स्कीन एलर्जी होऊ लागते. डेअरी प्रॉडक्टच्या कंपाउंड आणि अल्कोहोलच्या कंपाउंडचं नेचर एकदम उलटं असतं. ज्यामुळे केमिकल रिअॅक्शन होऊ शकतं.
दारू पिण्याचे साइड इफेक्ट
1) दारूमुळे ब्रेस्ट, तोंडाचा, घशाचा, इसोफेगस, वॉइस बॉक्स, रेक्टम कॅन्सरचा धोका असतो.
2) हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट डिजीज धोका
3) कमजोर इम्यून सिस्टीम
4) स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता कमी होणे
5) डिप्रेशन आणि एंग्जायटी