चुकूनही खाऊ नका करपलेले ब्रेड, वाढतो कॅन्सरचा धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 10:11 AM2019-01-03T10:11:00+5:302019-01-03T10:13:21+5:30
सकाळचा नाश्ता म्हटलं की, जास्तीत जास्त लोक नाश्त्यात ब्रेड खाणं पसंत करतात. ब्रेड-बटर किंवा टोस्ट आणि चहा कितीतरी लोकांचा आवडता नाश्ता असतो.
सकाळचा नाश्ता म्हटलं की, जास्तीत जास्त लोक नाश्त्यात ब्रेड खाणं पसंत करतात. ब्रेड-बटर किंवा टोस्ट आणि चहा कितीतरी लोकांचा आवडता नाश्ता असतो. पण अनेकदा नाश्ता तयार करताना टोस्टरमध्ये ठेवलेलं ब्रेड लक्ष न दिल्याने करपतं. अनेकदा लोक ऑफिसला जाण्याच्या घाईत याकडे दुर्लक्ष करतात आणि वेळेवर दुसरा पर्याय नसल्याने करपलेली ब्रेड खातात. पण ही करपलेली ब्रेड खाल्ल्याने कॅन्सरसारखा गंभीर आणि जीवघेणा आजाराचा धोका असतो.
कॅन्सरचा धोका
एका रिपोर्टनुसार ज्या पदार्थांमध्ये स्टार्चचं प्रमाण अधिक असतं, ते जर उच्च तापमानावर भाजले की, त्यांच्यात एक्रिलामाइड नावाचं केमिकल रिलीज होतं. हे तेच केमिकल आहे जे ज्याने आपल्या शरीराला कॅन्सरसारख्या आजाराचा धोका असतो.
स्टार्ट असलेल्या पदार्थांमध्ये अमीनो अॅसिड
एका डच रिसर्चनुसार, बटाटे आणि ब्रेड यांसारख्या स्टार्चयुक्त पदार्थांमध्ये अमीनो अॅसिड असतं. याला एस्पेरेगिन म्हटलं जातं. अशात जेव्हा स्टार्च असलेल्या पदार्थांना हाय टेम्प्रेचरवर गरम केलं जातं तेव्हा त्यातील एस्पेरेगिनसोबत मिळून एक्रिलामाइड केमिकल रिलीज होतं. त्यामुळे या पदार्थांचं सेवन धोकादायक ठरु शकतं.
अंतर्गत नुकसान
या प्रकारचे पदार्थ खाल्ल्यावर हे केमिकल्स डीएनएमध्ये प्रवेश करतात, जे पेशींना बदलवून टाकतं. याने कॅन्सरचा धोका वाढतो. तज्ज्ञांनुसार, एक्रिलामाइड शरीरात एक न्यूरोटॉक्सिनच्या रुपात कार्य करतं. न्यूरोटॉक्सिन एकप्रकारचं विष आहे, जे शरीराच्या आतील अंगांचं आणि प्रक्रियांचं नुकसान करतं.
कमी वेळ भाजा
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO नुसार, एक्रिलामाइडच्या हानिकारक प्रभावांची चर्चा अजून अर्धवट आहे. पण ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे की, कॅन्सरच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी स्टार्चयुक्त खाद्य पदार्थांना कमी वेळेसाठी भाजा किंवा शिजवा. सोबतच कोणतेही पदार्थ जास्त वेळ हाय टेम्प्रेचरवर भाजू नका.
काय आहे उपाय?
बटाटे आणि ब्रेड यांसारख्या पदार्थांचं सेवन कमी करायला हवं. जर असं शक्य नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे एक्रिलामाइडचा धोका कमी करण्यासाठी हे पदार्थ कमी शिजवा किंवा भाजा.
असाही एक रिपोर्ट
सँडविच ब्रेड, पाव, बन, पिझ्झा ब्रेड, बर्गर ब्रेड अशा सर्व घटकांमध्ये कॅन्सरजन्य केमिकल असल्याचा दावा सीएसईने आपल्या अहवालात केला आहे. त्यासाठी संस्थेच्या प्रदूषण मापन प्रयोगशाळेने दिल्लीतील विविध बेकरी व फास्ट फूट आऊटलेटमधील अनेक पॅकबंद पाव उत्पादनांची तपासणी केली असता त्यापैकी ७५ टक्के चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. जे नमुने तपासण्यात आले त्यामध्ये ८४ टक्के नमुन्यात पोटॅशियम ब्रोमेट व आयोडेट ही रसायने सापडली आहेत. पोटॅशियम ब्रोमेट तसेच पोटॅशियम लोडेट हे दोन्ही केमिकल कॅन्सरजन्य आहेत. या दोन्ही केमिकल्सचा वापर पीठ फुगवण्यासाठी केला जातो. पीठ फुगवल्यानंतर त्यात हे केमिकल उरत नाही असा दावा केला जात होता. पण तपासणी करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये त्यांचे घातक प्रमाण आढळल्याचा दावा संस्थेने केला आहे.