मासिक पाळी दरम्यान 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं; गंभीर समस्यांचे असू शकतात संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 09:57 AM2020-05-26T09:57:14+5:302020-05-26T10:02:27+5:30
या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला या लक्षणांबद्दल सांगणार आहोत.
मासिक पाळी एक सामान्य स्थिती असून दर महिन्याला २८ ते ३० दिवसांची सायकल पूर्ण झाल्यानंतर मासिक पाळी येते. मासिक पाळीदरम्यान शरीरातील रक्त, कचरा आणि एंडोमेट्रीअम म्हणजे रक्तातील जाडसर भाग योगीमार्गातून बाहेर येत असतो. साधारणपणे ११ ते १४ वर्ष वयोगटात मासिक पाळीसंबंधीत समस्या उद्भवण्यास सुरूवात होते. ४० ते ४५ या वयोगटात रजोनिवृत्ती म्हणजेच मासिक पाळी पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर असते. हा कालावधी १ ते २ वर्षांचा असू शकतो.
साधारणपणे मासिक पाळी ५ ते ६ दिवस असते. त्यावेळी पोटात दुखणं, पाठ दुखणं, चिडचिडपणा, थकवा, सुज येणं, जेवण्याची इच्छा नसणं अशा समस्या उद्भवतात. याव्यतिरिक्त अशी काही लक्षणं आहेत. ज्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला या लक्षणांबद्दल सांगणार आहोत.
वेळेवर मासिक पाळी न येणं
मासिक पाळी वेळेवर न येणं गंभीर आजारांचे लक्षण असू शकतं. त्यामुळे वजन वाढण्यापासून, मानसिक ताण येण्यापर्यंत अनेक समस्या उद्भवतात. थायरॉईड मानसिक ताण-तणावाचा सामना करावा लागू शकतो. या समस्यांपासून लांब राहायचं असेल तर संतुलित आहार घेण्यासोबत नियमीत व्यायाम करणं गरजेचं आहे. गंभीर स्थितीत स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यायला हवी.
असामान्य रक्तस्त्राव
जर तुम्ही बर्थ कंट्रोल पिल्स घेत असाल तर असामान्य रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. मासिक पाळीच्या दिवसात किंवा दिवस संपल्यानंतर जास्त रक्तस्त्राव होत असेल तर ओवरियन सीस्ट किंवा कॅन्सरचा धोका असू शकतो. म्हणून त्वरित तपासणी करणं गरजेचं आहे.
कमी रक्तस्त्राव
काही महिलांना पाळी वेळेवर येते पण दोन दिवस राहते. म्हणजेच रक्तस्त्राव कमी होतो. यामुळे अर्थातच गर्भधारणा होण्यात कोणताही त्रास होत नाही. तरीही हे योग्य नाही. घाबरण्याासारखे काहीही नसले तरी त्यासाठी योग्य वेळी डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे.
कोरोनापासून बचावासाठी फक्त ६ दिवसांचा कोर्स; होमिओपॅथिक औषधांबाबत तज्ज्ञांचा दावा
सतत शिंका येत असतील तर कोरोनाची भीती बाळगण्यापेक्षा 'हे' उपाय वापरून निरोगी राहा