आता कमी खर्चात करा ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार, हे स्वस्त औषध ठरेल फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 10:16 AM2019-12-24T10:16:36+5:302019-12-24T10:34:35+5:30
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायजेशन या संस्थेने स्तनांच्या कॅन्सरच्या आजारावर आधारीत एक नविन औषध तयार केले आहे.
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायजेशन या संस्थेने स्तनांच्या कॅन्सरच्या आजारावर आधारीत एक नविन औषध तयार केले आहे. जगभरातील महिला आता ब्रेस्ट कॅन्सरपासून वाचण्यासाठी अत्यंत कमी पैशात सुध्दा औषध घेऊ शकतात. या औषधाचं नाव ट्रॅस्टूजुमाब असे आहे. हे नविन औषध कोणत्याही केमिकल्सचा वापर न करता तयार करण्यात आले आहे. या गोळ्यांची आणि औषधांची किंमत इतर औषधांच्या तुलनेत ६५ टक्क्यांनी कमी आहे.
माध्यामांनी दिलेल्या माहीतीनुसार फर्स्ट स्टेज मधील कॅन्सर असताना जर या गोळ्यांचे सेवन केले. तर आजाराला वाढण्यापासून थांबवता येऊ शकतं.जगभरातील महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण कॅन्सरसारख्या आजारांवरचे उपचार फारच महागात पडतात. पैश्यांअभावी महिला या रोगांवरचे उपचार घेत नाहीत. त्यामुळे या स्वस्त औषधाचा वापर केल्याल महिला स्वतःला कॅन्सरपासून दूर ठेवू शकतात. हे असे पहिलेच औषध आहे. ज्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायजेशनने मान्यता दिलेले आहे. २०१८ मध्ये तब्बल २१ लाख महिलांचा मृत्यू हा ब्रेस्ट कॅन्सरमुळे झाला होता.
या औषधांचे अनेक बायोसिमीलर वर्जन उपलब्ध आहेत. WHO च्या वेबसाईटवर या प्रकारचे गोळ्या औषध तुम्हाला उपलब्ध होतील. ट्रॅस्टूजुमाब या औषधाचा इसेंशीयल मेडिसिन्समध्ये समावेश करण्यात आला होता. २०१८ मध्ये २१ लाख महिलांचा मृत्यू कॅन्सरने झाला होता. त्यापैकी ६ लाख ३० हजार महिलांचा मृत्यू उशीरा उपचार घेतल्याने तसंच उपचारासाठी असलेली औषध महागडी असल्यामुळे झाला होता. WHO च्या रिर्पोटनुसार २०४० पर्यंत जवळपास ३१ लाखापेक्षा जास्त रुग्ण हे स्तनांचा कॅन्सर झालेले असतील .