Coronavirus : कोरोनाचा नवा स्ट्रेन वेगाने पसरणारा; पण जीवघेणा नाही; तज्ज्ञांकडून मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 09:05 AM2021-01-02T09:05:38+5:302021-01-02T11:35:32+5:30
एक्सपर्टचं असं मत आहे की, नव्या स्ट्रेनबाबत टेंशन घेण्याचं काहीच कारण नाही. हा भलेही जुन्या स्ट्रेनच्या तुलनेत अधिक वेगाने संक्रामक आहे. पण जीवघेणा नाही.
नव्या स्ट्रेनच्या तुलनेत कोविडचा जुना स्ट्रेन जास्त धोकादायक आहे. ज्यात सर्वात जास्त जीव गेले आहेत. एका रिसर्चमधून याचा खुलासा झाला आहे. ब्रिटनमध्ये पब्लिक हेल्थ एजन्सी द्वारे करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये आढळून आले की, जुन्या स्ट्रेन जास्तीत जास्त रूग्णांना भरती तर करावंच लागलं, सोबतच जुन्या स्ट्रेनने मृत्यूही जास्त झालेत. त्यामुळे एक्सपर्टचं असं मत आहे की, नव्या स्ट्रेनबाबत टेंशन घेण्याचं काहीच कारण नाही. हा भलेही जुन्या स्ट्रेनच्या तुलनेत अधिक वेगाने संक्रामक आहे. पण जीवघेणा नाही.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एम्सचे माजी डायरेक्टर डॉ. एम सी मिश्रा यांनी सांगितले की, नव्या स्ट्रेनबाबत माहिती समोर येत आहे. त्यात थोडी दिलासादायक बाब ही आहे की, तो जास्त धोकादायक नाही. ते म्हणाले की, पब्लिक हेल्थ संस्थेकडून ३६०० रूग्णांवर एक रिसर्च करण्यात आला. यात दोन्ही स्ट्रेनचे १८००-१८०० रूग्ण घेतले गेले. पण यातील केवळ ४२ रूग्णांनाच हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. यातील २६ रूग्ण जुन्या स्ट्रेनमधील होते तर १६ रूग्ण नव्या स्ट्रेनचे. यातून हे समोर स्पष्ट होतं की, नव्या स्ट्रेनने पीडित रूग्णांमध्ये रिस्क कमी आहे त्यामुळे त्यांना भरतीही कमी व्हावं लागलं. तर जुन्या स्ट्रेनमध्ये हे प्रमाण जास्त आहे.
डॉ. मिश्रा म्हणाले की, याचप्रकारे जुन्या स्ट्रेनच्या २६ रूग्णांपैकी १२ रूग्णांचा मृत्यू झाला आणि नव्या स्ट्रेनच्या २६ रूग्णांपैकी १० रूग्णांचा मृत्यू झाला. इथे हे पाहिलं गेलं की, नव्या स्ट्रेनच्या तुलनेत जुन्या स्ट्रेनन पीडित रूग्णांचा मृत्यू अधिक झालाय. यातून हे स्पष्ट होतं की, नवा स्ट्रेन कमी जीवघेणा आहे. त्यामुळे नव्या स्ट्रेनबाबत पॅनिक होण्याची गरज नाही.
याबाबत मॅक्सचे कोविड एक्सपर्ट डॉक्टर रोमेल टिक्कू म्हणाले की, कुणीही पॅनिक होण्याची गरज नाही. आता आपण सगळेच कोरोना विरोधातील लढाई जिंकण्याच्या जवळ आलो आहोत. लवकरच देशात वॅक्सीनेशन प्रोग्राम सुरू होणार आहे. फक्त अजूनही आपण आधीसारखी काळजी घेतली पाहिजे, सर्व नियम पाळले पाहिजे. मास्क वापरणं, हात धुणं सुरूच ठेवलं पाहिजे. सोशल डिस्टंसिंग पाळलं पाहिजे. जर काही लक्षण दिसत असेल तर लगेच टेस्ट केली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला आयसोलेट करता येईल आणि संक्रमण रोखता येईल.