अरे व्वा! आता वजन वाढण्याचं टेंशन सोडा; या नवीन औषधानं लठ्ठपणा होणार कमी, संशोधनातून दावा

By Manali.bagul | Published: February 15, 2021 11:54 AM2021-02-15T11:54:20+5:302021-02-15T12:06:48+5:30

How to loss weight faster : जागतिक आरोग्य संघटनेनं २५ पेक्षा जास्त बीएमआयला ओव्हरवेट आणि ३० पेक्षा जास्त बीएमआयला लठ्ठपणाच्या वर्गात ठेवले आहे. दरम्यान लठ्ठपणाचा सामना करत असलेल्या लोकांसाठी एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. 

This new diabetes drug can become a game changer in weight loss and reducing obesity | अरे व्वा! आता वजन वाढण्याचं टेंशन सोडा; या नवीन औषधानं लठ्ठपणा होणार कमी, संशोधनातून दावा

अरे व्वा! आता वजन वाढण्याचं टेंशन सोडा; या नवीन औषधानं लठ्ठपणा होणार कमी, संशोधनातून दावा

googlenewsNext

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार लठ्ठपणाची (weight Gain)  समस्या एखाद्या माहामारीप्रमाणेच सर्वांमध्ये वाढताना दिसून येत आहे.  तुमचा वाचून विश्वास बसणार नाही पण दरवर्षी ओव्हर वेट किंवा लठ्ठपणामुळे जवळपास २८ लाख लोकांना मृत्यूचा सामना करावा लागतो. जागतिक आरोग्य संघटनेनं २५ पेक्षा जास्त बीएमआयला ओव्हरवेट आणि ३० पेक्षा जास्त बीएमआयला लठ्ठपणाच्या वर्गात ठेवले आहे. दरम्यान लठ्ठपणाचा सामना करत असलेल्या लोकांसाठी एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. 

१६ महिन्यांमध्ये १५ टक्के कमी झालं वजन

द न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार सेमाग्लूटाईड नावाचे डायबिटीसचे औषध असे आहे, ज्याचे सेवन केल्यानं ओव्हरवेट आणि लठ्ठपणानेग्रस्त असलेल्या लोकांना १६ महिन्यांच्या आत जवळपास १५ टक्के वजन कमी करण्यास मदत मिळाली. हे औषध एका इंजेक्शनच्या रुपात दिलं जातं.  ज्याचा एक शॉट आठवड्यातून एकदा घ्यायचा असतो.

या औषधांच्या मदतीनं शरीरातील इंसुलिनचं प्रमाण वाढवण्यास मदत होते आणि भूक कमी होण्यास मदत होते. अमेरिकेतील फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन  (FDA) कडून या औषधाबाबत अधिक माहिती दिली जाणार आहे. जर याला अप्रुव्हल मिळाले तर अमेरिकन मार्केटमध्ये उपलब्ध होणारं हे वजन कमी करणयाचं पाचवं औषध असेल. या औषधानं वेट लॉस सर्जरीप्रमाणे वजन कमी करती येईल.

या औषधांच्या अभ्यासासाठी १६  देशांमधील एकूण २ हजारांपेक्षा जास्त लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. यात औषधाचे सेवन करत असलेल्या एकूण ७० टक्के लोकांमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त वजन कमी झालेलं दिसून आलं. तसंच कॅलरी इनटेक (Calorie Intake) सुद्धा या औषधांच्या सेवनानं कमी झाले होते. या अभ्यासाचे मुख्य लेखक आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे रॅशेल बॅटरहॅम यांनी सांगितले की, ''आतापर्यंत कोणतंही औषध या पातळीवर वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरलेलं नाही. त्यामुळे  हे औषध एक गेमचेंजर ठरले आहे. पहिल्यांदाच असं होणार आहे की, जेव्हा लठ्ठपणानेग्रस्त असलेल्या लोक वजन कमी करण्यासाठी वेट लॉससर्जरी शिवाय इतर उपायांचा विचार करू शकतील. ''

चिंताजनक! समोर आलं कोरोनाचं नवं लक्षण; कोरोना रुग्णाची बोटं काळी पडल्यानं कापावी लागली

या अभ्यासाशी संबंधित आणखी एक लेखक रॉबर्ट कुशनर म्हणतात की, ''जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, गॅस्ट्रोइफॅगेयल रिफ्लक्स रोग (जीईआरडी), कर्करोग इत्यादीसारख्या आरोग्याच्या  समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत जर वजन 10 टक्क्यांनी कमी केले तर या आजारांवर नियंत्रण अधिक चांगल्या प्रकारे मिळवण्यास मदत होते.

औषधाचे काही साईड इफेक्ट्सही आहेत

ज्या लोकांनी हे औषध घेतले त्यांना मळमळ, उलट्या, अतिसार आणि बद्धकोष्ठता यासारखे काही दुष्परिणाम देखील दिसले. हे दुष्परिणाम अभ्यासामध्ये सामील झालेल्या सुमारे तीन चतुर्थांश लोकांमध्ये दिसून आले. औषध घेतल्यानंतर या सहभागींमध्ये शारीरिक कार्य सुधारण्यास सुरवात झाली, रक्तदाब आणि ग्लूकोज नियंत्रण देखील सुधारले. दिलासादायक! कोवॅक्सिन, कोविशिल्डनंतर आता गेमचेंजर ठरतोय नेझल स्प्रे; कोरोनाचा होणार खात्मा

Web Title: This new diabetes drug can become a game changer in weight loss and reducing obesity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.