आयुष्याची शंभरी गाठायची आहे? मग या पदार्थांचं सेवन करणं टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 04:27 PM2019-01-17T16:27:08+5:302019-01-17T20:01:52+5:30

निरोगी राहण्यासाठी आणि दिर्घायुष्यासाठी योग्य आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, साखर आणि मांसाचे आहारातील 50 टक्के सेवन कमी करून त्याऐवजी फळं, भाज्या आणि ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्याने निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते.

New diet plan for save planet what to eat for long life | आयुष्याची शंभरी गाठायची आहे? मग या पदार्थांचं सेवन करणं टाळा!

आयुष्याची शंभरी गाठायची आहे? मग या पदार्थांचं सेवन करणं टाळा!

googlenewsNext

निरोगी राहण्यासाठी आणि दिर्घायुष्यासाठी योग्य आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, साखर आणि मांसाचे आहारातील 50 टक्के सेवन कमी करून त्याऐवजी फळं, भाज्या आणि ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्याने निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते. द जर्नल लॅसेंटमधून प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये जगभरातील लोकांसाठी एक खास डाएट प्लॅन देण्यात आला आहे. संशोधकांचं असं मत आहे की, या नव्या डाएट प्लॅनमधून जगभरामध्ये प्रत्येक वर्षी होणारे 11.6 मिलियन मृत्यू वेळेआधी रोखले जाऊ शकतात. 

कमी करा मांस आणि साखरेचं सेवन 

जगभरामध्ये वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे वर्ष 2050पर्यंत मांस आणि साखरेसारखे पदार्थ अर्धेच शिल्लक राहतील. त्यासाठी संशोधनामध्ये असं सुचवण्यात आलं आहे की, श्रीमंत देशांमध्ये मांसाची विक्री फार होते त्यांना त्यामध्ये घट करणं आवश्यक आहे. दक्षिण आशियाई क्षेत्रांमध्ये सध्या मांसाची कमतरता असल्यामुळे तेथील लोकांमध्ये कॅलरी आणि प्रोटीनची कमतरता दिसून आली आहे. 

भविष्यामध्ये मांसाच्या विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी एक नवा नियम तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये तरूणांना प्रतिदिन फक्त 14 ग्रॅम मांस देण्यात येईल. त्यामुळे ते 30 पेक्षा जास्त कॅलरी वाचवू शकतील. 

फळं आणि भाज्यांचं सेवन करणं वाढवा

संशोधकांनी सांगितले की, फळं, भाज्या आणि फळभाज्या म्हणजेच छोले, डाळ खाण्याचं प्रमाण दुपटीने वाढलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे गरीब देशांमध्ये जिथे 800 मिलियनपेक्षा अधिक लोकांना पुरेशा कॅलरीज मिळतात. 

शरीराला जवस आणि ब्राउन राइस सारख्या पदार्थांची आवश्यकता असते. परंतु, बटाटा आणि कंद यांसारख्या स्टार्च असणाऱ्या भाज्या एक दिवसात 50 ग्रॅमपर्यंतच मर्यादीत असतात. रिपोर्टनुसार लेखकांनी सांगितले की, प्रत्येक क्षेत्रामध्ये आयडियल डाएट वेगवेगळे असतात. त्यासाठी एक मेन्यू डिझाइन करण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रत्येकाला 2500 दैनिक कॅलरी मिळणं आवश्यक असतं. 

नट्स आणि सीड्स असतात आवश्यक 

संशोधकांचं असं म्हणणं आहे की, अनहेल्दी सॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन कमी करण्यासाठी लोकांच्या डाएटमध्ये पोषक तत्वांचा समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लोकांच्या डाएटमध्ये नट्स आणि सीड्स यांसारख्या हेल्दी पदार्थांचा समावेश करावा. तुम्हाला प्रत्येक दिवशी 75 ग्रॅमपर्यंत भुईमूगाच्या शेंगांचं सेवन करणं आवश्यक असतं. तसेच या दिवसांमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्समध्ये कपात करणं आवश्यक असतं.

 

Web Title: New diet plan for save planet what to eat for long life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.