जपानमधील लोकांच्या तुलनेत भारतीयांना लवकर वृद्धत्त्व जाणवू लागतं - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 10:01 AM2019-03-12T10:01:04+5:302019-03-12T10:20:54+5:30
भारतात राहणाऱ्या लोकांना जपान आणि स्वित्झर्लॅंडमध्ये राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत लवकर आणि अधिक वृद्धत्व जाणवतं किंवा त्यांना वयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो.
(Image Credit : www.agewellfoundation.org)
भारतात राहणाऱ्या लोकांना जपान आणि स्वित्झर्लॅंडमध्ये राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत लवकर आणि अधिक वृद्धत्व जाणवतं किंवा त्यांना वयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो. सोबत वृद्धत्वाच्या नकारात्मक प्रभावांशीही झगडावं लागतं. पहिल्यांदाच अशाप्रकारच्या करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हा खुलासा झाला आहे. या रिसर्चमध्ये ग्लोबल बर्डेन ऑफ डिजीजच्या अभ्यासाच्या आकडेवारीचा वापर केला गेला आहे.
सर्वात आणि कमी वयात ३० वर्षांचं अंतर
द लांसेट पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित या रिसर्चनुसार, या देशांमध्ये सर्वाधिक आणि सर्वात कमी वयाच्या लोकांमध्ये जवळपास ३० वर्षांचं अंतर आहे. अभ्यासकांना आढळलं की, सरासरी ६५ वर्षाच्या एखाद्या व्यक्तीला होणाऱ्या वयासंबंधी समस्या आणि जपान-स्वित्झर्लॅंडमध्ये राहणाऱ्या ७६ वर्षाचा एखादा व्यक्ती व पापुआ न्यू गिनीमध्ये राहणाऱ्या ४६ वर्षाच्या व्यक्तीला आरोग्यासंबंधी समस्यांचा स्तर हा समान असतो. विश्लेषणातून हे समोर आलं आहे की, भारतात राहणाऱ्या लोकांना आरोग्यासंबंधी याच समस्या ६० वयापर्यंत येता-येता जाणवू लागतात.
लोकांचा दीर्घायुषी होणं संधी की धोका?
या अभ्यासाचे मुख्य लेखक आणि अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये पोस्ट डॉक्टोरलची अभ्यासिका एंजेला वाई चांग म्हणाली की, असमान निष्कर्ष हे दाखवतात की, लोकांचं दीर्घायुषी होणं एकतर संधी सारखं असू शकतं किंवा लोकसंख्येच्या समग्र कल्याणासाठी धोका ठरू शकतं. हे वयासंबंधी आरोग्यावर निर्भर करतं. चांग म्हणाल्या की, 'वयासंबंधी आरोग्य समस्या लवकर सेवानिवृत्ती, कमी कार्यक्षम आणि आरोग्यावर अधिक खर्चाचं कारण ठरू शकतात. आरोग्य प्रणालीवर चांगल्याप्रकारे काम करणाऱ्या सरकारी आणि इतर संस्थांनी लोकांना वयासंबंधी नकारात्मक प्रभाव कधीपासून दिसायला लागतो यावर विचार करण्याची गरज आहे.