नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांच्या DNA ला धोका - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 11:07 AM2019-01-28T11:07:42+5:302019-01-28T21:56:19+5:30
नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांच्या आरोग्याला कशाप्रकारे वेगवेगळे नुकसान होऊ शकतात. यावर याआधीही अनेक रिसर्च झाले आहेत.
(Image Credit : Cristine Meredith Miele Foundation)
नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांच्या आरोग्याला कशाप्रकारे वेगवेगळे नुकसान होऊ शकतात. यावर याआधीही अनेक रिसर्च झाले आहेत. आता यात आणखी एका रिसर्चची भर पडली असून यात सांगण्यात आलं आहे की, नाईट शिफ्ट करणाऱ्यांना कमी झोपेमुळे आणि रात्री जागण्यामुळे त्यांच्या डीएनएचं नुकसान होऊ शकतो. यामुळे त्यांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. नाईट शिफ्टमध्ये काम केल्याने कॅन्सर, डायबिटीज, हृदयरोग, श्वासासंबंधी आजारांचा सामना करावा लागू शकतो.
डीएनएला धोका होण्याची शक्यता ३० टक्के जास्त
(Image Credit : Discover Magazine Blogs)
एनेस्थेशिया अकॅडमिक जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या डीएनएमध्ये सुधार करणारे जीन त्यांच्या गतीने काम करू शकत नाहीत आणि झोप पूर्ण न घेतल्यामुळे ही स्थिती आणखी जास्त बिकट होऊ शकते. शोधात असं आढळून आलं की, जे व्यक्ती रात्रभर काम करतात, त्यांच्या डीएनएला बसणारा फटका हा रात्री काम न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत ३० टक्के अधिक बसू शकतो. जे लोक रात्री काम करतात आणि पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत, त्यांच्या डीएनएचं नुकसान होण्याचा धोका २५ टक्के अधिक वाढतो.
डीएनएचं नुकसान होण्याचा धोका वाढला
(Image Credit : medicalnewstoday.com)
यूनिव्हर्सिटी ऑफ हॉंगकॉंगचे रिसर्चचे सहकारी एस. डब्ल्यू. चोई म्हणाले की, 'डीएनएचं नुकसान होणं म्हणजे डीएनएच्या मुलभूत संरचनेत बदल होणे हे आहे. म्हणजे डीएनए जेव्हा पुन्हा तयार होतो तेव्हा त्यात दुरुस्ती किंवा सुधारणा होत नाही. हा नुकसान झालेला डीएनए असतो. जेव्हा डीएनएमध्ये सुधारणा होऊ शकत नाही तेव्हा स्थिती आणखी गंभीर होते आणि याने पेशींचं नुकसान होतं. डीएनएमध्ये सुधारणा होत नसल्याने डीएनएची एंड-ज्वॉयनिंग होऊ शकत नाही, अशावेळी ट्यूमरचा धोका वाढतो.
या रिसर्चमध्ये २८ ते ३३ वर्षांच्या निरोगी डॉक्टरांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. या सर्वांनी तीन दिवस पुरेशी झोप घेतली होती. त्यानंतर त्या डॉक्टरांच्या रक्ताची चाचणी घेण्यात आली ज्यांनी रात्री काम केलं होतं. त्यांनी झोपही कमी घेतली होती.
ही सुद्धा समस्या होते
एका दुसऱ्या रिसर्चनुसार नाईट शिफ्टमध्ये काम करणारे वेळेवर जेवण करु शकत नसल्याने याचा परिणाम यकृतावर होऊन त्यासंदर्भात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या आपल्या आरोग्यासाठी धोक्याच्या ठरु शकतात. या संशोधनात संशोधकांनी उंदरांच्या पचन क्षमतेचा अभ्यास केला. या अध्ययना दरम्यान, उंदारांना रात्रीच्या वेळेस चारा दिला. तर दिवसाच्या वेळेत, त्यांना आराम करु दिला. यानुसार संशोधकांना दिवसा काम करणाऱ्याच्या तुलनेत नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्याच्या यकृताचा आकार वाढत असल्याचे आढळले. तसेच यकृताचा आकार वाढताना त्याची ग्रहण करण्याची क्षमता वाढते, असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.
सेल नावाच्या पत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यात तुमची दैनंदिन क्रियेची लय बिघडते, तेव्हा त्याचा परिणाम यकृतावर होत असल्याचं म्हणलं आहे. जिनेव्हा विश्वविद्यालयाचे शोधप्रमुख फ्लोर सिंटूरल यांनी सांगितलं की, ‘रात्रीच्या वेळस यकृताचा आकार ४० टक्के वाढतो तर दिवसा याचा आकार पूर्वीप्रमाणे असतो. जीवनपद्धती बदलल्यास त्याचा परिणाम शरिरातील कार्यप्रणालीवर होतो.’