नैसर्गिक गोड पदार्थांचं सेवन करून Type 2 Diabetes चा धोका वाढतो - रिसर्च 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 10:03 AM2019-10-09T10:03:57+5:302019-10-09T10:10:36+5:30

सामान्यपणे असं मानलं जातं की, साखर आणि आर्टिफिशिअल स्वीटनरने तयार केलेल्या साखरीने डायबिटीसचा धोका वाढतो.

New study says naturally sweet drinks also increases the risk of type 2 diabetes | नैसर्गिक गोड पदार्थांचं सेवन करून Type 2 Diabetes चा धोका वाढतो - रिसर्च 

नैसर्गिक गोड पदार्थांचं सेवन करून Type 2 Diabetes चा धोका वाढतो - रिसर्च 

Next

(Image Credit : versanthealth.com)

सामान्यपणे असं मानलं जातं की, साखर आणि आर्टिफिशिअल स्वीटनरने तयार केलेल्या साखरीने डायबिटीसचा धोका वाढतो. पण आता एका रिसर्चमधून असा दावा करण्यात आला आहे की, नैसर्गिकपणे गोड असलेले पेय जसे की, फळांचा ज्यूस प्यायल्याने सुद्धा टाइप २ डायबिटीस धोका अधिक वाढतो. हा रिसर्च डायबिटीस केअर नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

नॅच्युरल शुगरने डायबिटीसचा धोका

(Image Credit : tripadvisor.in)

या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, डाएट सॉफ्ट ड्रिंक ज्यात आर्टिफिशिअल शुगर असते, त्याने टाइप २ डायबिटीसचा धोका तर असतोच सोबतच नैसर्गिक रूपाने गोड असलेले पदार्थ ज्यात शुगर आढळते, त्यांचं सेवन करणं देखील भविष्यात डायबिटीस होण्याचा धोका वाढतो. हॉर्वर्ड टी एच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थनुसार, साखर असलेल्या पदार्थांऐवजी जर विना साखरेच्या चहा किंवा कॉफीचं सेवन केलं तर टाइप २ डायबिटीसचा धोका २ ते १० टक्क्यांनी कमी केला जाऊ शकतो. 

३ वेगवेगळ्या रिसर्चच्या डेटाचं विश्लेषण

(Image Credit : newatlas.com)

या रिसर्चमध्ये गेल्या २२ ते २६ वर्षातील डेटाच्या ३ वेगवेगळ्या रिसर्चचा अभ्यास करण्यात आला. ज्यात नर्सेज हेल्थ स्टडी, द नर्सेज हेल्थ स्टडी २ आणि द हेल्थ प्रोफेशनल्स फॉलोअप स्टडींचा समावेश आहे. यात १ लाख ९२ हजारपेक्षाही जास्त पुरूष आणि महिलांचा समावेश करण्यात आला होता. या रिसर्चच्या माध्यमातून अभ्यासकांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, गोड पेय पदार्थाचं सेवन केल्यावर काळानुसार शरीरावर कसा प्रभाव होतो आणि टाइफ २ डायबिटीसचा धोका किती राहतो.

फळांचा ज्यूस कंट्रोलमध्ये सेवन करा

या रिसर्चच्या निष्कर्षातून समोर येतं की, नॅच्युरल शुगर सुद्धा टाइप २ डायबिटीसचा धोका कमी करत नाही. अभ्यासकांनी सल्ला दिला आहे की, नॅच्युरल ज्यूसमध्ये पोषक तत्वांचं प्रमाण भरपूर असतं. पण ज्यूसचं सेवन कमी करायला हवं. असं न केल्यास डायबिटीसचा धोका राहतो.


Web Title: New study says naturally sweet drinks also increases the risk of type 2 diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.