प्लास्टिकऐवजी आता लाकडाचे चमचे आणि प्लेट्स वापरत असाल तर वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 11:04 AM2020-01-10T11:04:51+5:302020-01-10T11:06:11+5:30
प्लास्टिकचा वापर बंद करून पॅकेजिंग आणि यूज अॅन्ड थ्रो कटलरीसाठी आलेल्या नव्या मटेरिअलमध्ये लाकडापासून तयार अनेक वस्तू आहेत.
प्लास्टिकचा वापर बंद करून पॅकेजिंग आणि यूज अॅन्ड थ्रो कटलरीसाठी आलेल्या नव्या मटेरिअलमध्ये लाकडापासून तयार अनेक वस्तू आहेत. पण आता समोर आले आहे की, प्लास्किकऐवजी वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या वस्तूच प्लास्टिकपेक्षाही जास्त धोकादायक आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, सुपरमार्केट आणि अनेक फूड कंपन्या प्लास्टिकचा वापर बंद करण्याच्या दबावामुळे कार्डबोर्ड कंटेनर वापरतात. या कंटेनरवर अशा मटेरिअलचं कोटिंग केलं जातं ज्या रिसायकल केल्या जाऊ शकत नाहीत. असंच पेपर स्ट्रॉबाबतही आहे.
पेपर बॅग्सने होतं ग्रीन हाउस गॅसचं उत्सर्जन
(Image Credit : Social Media)
तज्ज्ञांनुसार काही अशाही पेपर बॅग्स मार्केटमध्ये आहेत की, ज्याने फार जास्त प्रमाणात ग्रीन हाउस गॅसचं उत्सर्जन होतं. एका मीडिया रिपोर्टनुसार, प्लास्टिकच्या काटे-चमच्यांऐवजी आता लाकडांचा वापर होऊ लागला आहे. ज्याने प्लास्टिकच्या तुलनेत पर्यावरणाचं अधिक नुकसान होऊ लागलं आहे.
प्लास्टिकच्या तक्रारी वाढल्या
इंग्लंडचा एका सुपरमार्केटचं मत आहे की, लोकांकडून प्लास्टिकबाबत तक्रारी मिळत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, प्लास्टिकला इथे काहीच स्थान दिलं गेलं नाही पाहिजे. यावर्षी लोकांच्या तक्रारींमध्ये साधारण ८०० टक्के वाढ झाली आहे. अनेक बेकरीचे पदार्थ जसे की, बिस्कीट आणि केकमध्ये सिंगल यूज प्लास्टिकच्या ऐवजी पेपर बॅग्सचा वापर केला जात आहे.
प्लास्टिक इतक्याच धोकादायक पेपर बॅग
या पेपर बॅग प्लास्टिक इतक्याच धोकादायक आहेत. यातून निघणारं कार्बन वातावरणावर जास्त नकारात्मक प्रभाव टाकतं. पण हेही बघावं लागेल की, हे तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मटेरिअलचा वापर केला जातो.