सावधान! फक्त एका सुक्ष्मकणामुळेही 'असं' पसरू शकतं कोरोना संक्रमण; संशोधनातून खुलासा

By manali.bagul | Published: September 28, 2020 04:38 PM2020-09-28T16:38:33+5:302020-09-28T16:43:01+5:30

CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरस एकाकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित होतो. तो प्रसार आपण रोखू शकलो तर माहामारीला वाढण्यापासून रोखता येऊ शकतं असा शास्रज्ञांचा अंदाज आहे.

New study suggest tiny airborne particles may pose a big coronavirus problem | सावधान! फक्त एका सुक्ष्मकणामुळेही 'असं' पसरू शकतं कोरोना संक्रमण; संशोधनातून खुलासा

सावधान! फक्त एका सुक्ष्मकणामुळेही 'असं' पसरू शकतं कोरोना संक्रमण; संशोधनातून खुलासा

Next

जीवघेणा कोरोना विषाणू हा  एका व्यक्तीपासून इतरांना कसं संक्रमित करतो. याचा शोध घेण्यासाठी मेरीलँड विद्यापीठाच्या एका प्रयोगशाळेत कोरोना रुग्णांवर काही प्रयोग सुरू आहेत. यासाठी एका यंत्राला शंकूच्या आकाराचा भाग तयार केला आहे. रुग्णाला या भागाच्या मोठ्या तोंडासमोर आपलं तोंड ठेवून खुर्चीवर बसावं लागतं. जवळपास  ३० मिनिटं ही चाचणी सुरू असते. या चाचणीदरम्यान  रुग्णाला शब्द उच्चारायला, गायला किंवा शांतपणे बसायला सांगितले जाते.  या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांना कधी कधी खोकला येतो. हे सर्व करताना शंकू त्या व्यक्तीच्या तोंडातून आणि नाकातून येणारी प्रत्येक गोष्ट शोषून घेतो.

या उपकरणाला Gesundheit असं म्हटलं जातं. या पद्धतीमुळे संक्रमित रुग्णाच्या नाकातून, श्वास घेण्याच्या आणि सोडण्याचा प्रक्रियेतून, तोंडातून बाहेर पसरलेल्या सूक्ष्म कणांचं विशाल रूप तज्ज्ञांना या उपकरणात पाहता येतं आणि त्यावर संशोधन सुरू होते. कोरोना व्हायरस एकाकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित होतो. तो प्रसार आपण रोखू शकलो तर माहामारीला वाढण्यापासून रोखता येऊ शकतं असा शास्रज्ञांचा अंदाज आहे.

रुग्णाकडून हवेत प्रसारित होत असलेले पाण्याचे ड्रॉपलेट्स हे वेगवेगळ्या आकाराचे असतात. हे ड्रॉपलेट्स कधी लहान तर कधी मोठे असतात. हलके ड्रॉपलेट्स दूरवर जाऊ शकतात. त्यातून इतरांपर्यंत कोरोनाचं संक्रमण पसरतं. म्हणून सोशल डिस्टेंसिंग पाळताना जवळपास  ६ फुटांचे अंतर ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून ड्रॉपलेट्स इतरांच्या शरीरात प्रवेश न करता जमिनीवर पडतील. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. 

कोरोना हवेतून पसरतो का? वाचा या मागचं खरं कारण

हवेतून संसर्गाची जागतिक आरोग्य संघटनेने शक्यता वर्तवल्याची बातमी आल्यापासून अनेकांचा गैरसमज झाला होता की, कोरोना काही किलोमीटर दूर व एका गावातून इतर गावापर्यंत उडून संसर्ग करू शकतो. पण असे मुळीच नाही. तो हवेतून जात असला तर आधी १ मीटरच्या थोडा पुढे कदाचित ३, ४ किंवा ५ मीटर पुढे जाण्याची शक्यता आहे. ही शक्यता जागा किती बंद आहे यावर अवलंबून आहे.

हवेतून संसर्गाची शक्यता असली तरी मुख्य संसर्गाचा स्रोत हा मोठ्या संसर्गकणांचा म्हणजे १ मीटरच्या अंतरावरच आहे. हवेतून प्रसाराची शक्यता ही कमी जागेत व वारे वाहण्यास फार वाव नाही अशा बंद जागेतच जास्त आहे. तसेच हवेतून संसर्गित होत असलेल्या कणांची संसर्गक्षमता ही १ मीटरच्या आत मोठ्या संसर्गकणांपेक्षा कमी आहे. म्हणून एकमेकांपासून एक मीटरपेक्षा जास्त अंतराने उभे राहून सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व अबाधित राहणार आहे. 

हवेतून संसर्गाच्या अल्पशा शक्यतेचे महत्त्व काय ?

हवेतून संसर्गाची शक्यता ही बंद जागेत जास्त लोक जमल्यावरच असल्याने हे टाळावे व कामाच्या ठिकाणी शक्यतो दार, खिडक्या उघडी ठेवावी. लग्नसमारंभ, धार्मिक स्थळं, बार अशा बंद जागेत जास्त गर्दी होते अशी ठिकाण जाणे टाळावे. हवेतून संसर्गाची शक्यता गृहीत धरली तरी सर्वांनी मास्क वापरल्यास बचाव होईलच. सोशल डिस्टन्सिंग पाळणे सुरू ठेवावे. या गोष्टी पाळल्या तर आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो.

हे पण वाचा-

काळजी वाढली! हर्ड इम्युनिटीपासून भारत अजूनही खूप दूर; आरोग्यमंत्र्यांचा इशारा 

आता नाकाद्वारे दिली जाणार कोरोनाची लस; इंजेक्शनच्या तुलनेत 'अशी' ठरणार प्रभावी

काळजी वाढली! कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा

कोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे?, जाणून  घ्या

Web Title: New study suggest tiny airborne particles may pose a big coronavirus problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.