फ्रूट ज्यूस जास्त प्यायल्याने अकाली मृत्यूची शक्यता - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 05:00 PM2019-05-20T17:00:19+5:302019-05-20T17:02:58+5:30
जर तुम्ही विचार करत असाल की, फ्रुट ज्यूस हेल्दी असतो आणि त्याच्या सेवनाने तुमचं आरोग्य उत्तम राखण्यासाठीही मदत होते. पण हा तुमचा गैरसमज आहे. कोल्डड्रिंक्स, इतर सोडा असणारे ड्रिंक्स किंवा लेमेनेड तुमच्या आरोग्याला जेवढं नुकसान पोहोचवतात.
जर तुम्ही विचार करत असाल की, फ्रुट ज्यूस हेल्दी असतो आणि त्याच्या सेवनाने तुमचं आरोग्य उत्तम राखण्यासाठीही मदत होते. पण हा तुमचा गैरसमज आहे. कोल्डड्रिंक्स, इतर सोडा असणारे ड्रिंक्स किंवा लेमेनेड तुमच्या आरोग्याला जेवढं नुकसान पोहोचवतात. त्यापेक्षा कित्येकपट्टींनी जास्त फ्रुट ज्यूस आरोग्यासाठी घातक ठरतात. ऐकून धक्का बसला असेल ना? हे आम्ही सांगत नसून एका रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. रिसर्चनुसार, फ्रुट ज्यूसच्या सेवनाने वेळेआधी मृत्यू होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.
100 टक्के फ्रूट ज्यूसची तुलना कोला आणि लेमेनेडसोबत करण्यात येते
काही दिवसांमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून असा खुलासा करण्यात आला आहे की, अनेक लोक मोठ्या प्रमाणावर शुगर ड्रिंक्स आणि फ्रुट ज्यूसचं सेवन करतात. त्यांच्यामध्ये वेळेआधी मृत्यू होण्याचा धोका अधिक वाढतो. अमेरिकेतील संशोधकांनी पहिल्यांदा 100 टक्के फ्रुट ज्यूसची तुलना कोला आणि लेमेनेड यांसारख्या गोड पदार्थांसोबत केली होती. संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, शुगर ड्रिंक्स आणि फ्रुट ज्यूस दोघांमध्येही फार समानता आहे. त्यामुळे या दोन्हींच्या अतिसेवनाने अकाली मृत्यूचा धोका वाढतो. तसेच त्यांनी असं देखील सांगितलं की, याबाबत आणखी रिसर्च करण्याची गरज आहे.
जास्त फ्रुट ज्यूस प्यायल्याने वेळेआधी मृत्यूचा धोका 24 टक्क्यांनी वाढतो
एक्सपर्ट्सनुसार, प्रत्येक दिवशी 150 एमएल ग्लास फ्रुट ज्यूसचं सेवन केल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका राहत नाही. परंतु याच्या अतिसेवनाने मृत्यूचा धोका 24 टक्क्यांनी वाढतो. सोडा असणाऱ्या शुगर ड्रिंक्सचं जास्त सेवन केल्याने वेळेआधी मृत्यू होण्याचा धोका 11 टक्क्यांनी वाढतो. याचा अर्थ असा की, मोठ्या प्रमाणावर केलेलं फ्रुट ज्यूसचं सेवन किंवा सोडा असणाऱ्या ड्रिंक्स जास्त हानिकारक ठरतात.
सोडा, शुगरी ड्रिंक्स आणि फ्रूट ज्यूसच्या सेवनाने तपासणी
जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन (JAMA) मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या नव्या रिसर्चनुसार, 13 हजार 440 लोकांचा डाटा तपासण्यात आला. त्यानंतर प्रश्न-उत्तरांमार्फत या लोकांच्या सोडा आणि शुगर ड्रिंक्सच्या इनटेकसोबत 100 टक्के फ्रुट ज्यूसच्या सेवनाचे आकडेही रेकॉर्ड करण्यात आले. यातून हे समजुन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की, केव्हा आणि कितपत ड्रिंक्सचं सेवन करतात.
फ्रूट ज्यूस आणि शुगरी ड्रिंक्सच्या न्यूट्रिएंट कंटेटही एकसमान
6 वर्षांच्या एका फॉलोअप दरम्यान असं समजलं की, एका सरासरीनुसार, जवळपास 1 हजार लोकांना सर्व्हेमध्ये सहभागी करण्यात आले होते. त्यातील 168 लोकांचा मृत्यू कोरोनरी हार्ट डिजीज म्हणजेच हृदयासंबंधी आजारांमुळे झाला. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, रिसर्चमधील निष्कर्ष सांगतात की, जास्त साखर असणारे पेय पदार्थ ज्यांमध्ये सोडा, लेमेनेड आणि फ्रूट ज्यूस यांसारख्या ड्रिंक्सचा समावेश असण्याचा संबंध वाढलेल्या मृत्यू दराशी आहे. तसेच 100 टक्के फ्रूट ज्यूस आणि शुगर स्वीटेंड बेवरेजचं (SSB) न्यूट्रिएंट कंटेटही एकसमानच आहे.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून त्या एका रिसर्चमधून सिद्ध झालेल्या आहेत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.