भारतातील 77 टक्के लोकांना डाएटशी देणं-घेणं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 01:29 PM2019-01-28T13:29:23+5:302019-01-28T13:31:24+5:30

जगभरात वेगान वाढणारी समस्या म्हणजे लठ्ठपणाची. त्यासाठी अनेक लोक डाएटचा आधार घेत असतात. आपण बऱ्याचदा पाहतो अनेक लोक आपलं डाएट पाळण्यासाठी अनेक उपाय करत असतात.

New survey claims 77 percent indians are happy with their weight think dieting is pointless | भारतातील 77 टक्के लोकांना डाएटशी देणं-घेणं नाही!

भारतातील 77 टक्के लोकांना डाएटशी देणं-घेणं नाही!

Next

जगभरात वेगान वाढणारी समस्या म्हणजे लठ्ठपणाची. त्यासाठी अनेक लोक डाएटचा आधार घेत असतात. आपण बऱ्याचदा पाहतो अनेक लोक आपलं डाएट पाळण्यासाठी अनेक उपाय करत असतात. तसेच ते डाएट फ्रिक असतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्याला अनेक लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत असले किंवा डाएट कॉन्शिअस असल्याचे पाहायला मिळत असले तरी बऱ्याच लोकांना डाएट किंवा वजन कमी करण्याबाबत काहीच वाटत नाही. अशी लोकं डाएटऐवजी चांगल्या आणि चविष्ट खाण्याला पहिली पसंती देतात. त्याना आपलं वाढलेलं वजन आणि लूक यामुळे काही फरक पडत नाही. आता तुम्ही म्हणाल की, हे तुम्हाला कोणी सांगितलं? आमच्या ओळखीतले अनेक जण आपलं डाएट व्यवस्थित फॉलो करतात. तर हे आम्ही बोलत नसून, एका सर्वेमधून हा खुलासा करण्यात आला आहे. 

डाएटिंगऐवजी टेस्टी फूड खाणं पसंत करतात अनेक लोक 

ग्लोबल मार्केट रिसर्च कंपनी lpsosने काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे केला होता. ज्यामध्ये एका गोष्टीचा खुलासा झाला की, जर भारतातील लोकांना डाएटिंग आणि टेस्टी फूड यांमधील फक्त एकच गोष्ट निवडण्यास सांगितली तर, जास्तीत जास्त भारतीय टेस्टी फूडचीच निवड करतील. कंपनीच्या सर्वेनुसार जवळपास 77 टक्के भारतीय असे आहेत जे टेस्टी फूड आणि वजन नियंत्रणात ठेवणं यामध्ये टेस्टी फूडलाच प्राधान्य देतात. 

मिडल क्लास लोकांना डाएटिंगचे आकर्षण फार कमी

lpsosने हा सर्व्हे ऑगस्ट ते सप्टेंबर 2018मध्ये एक हजार शहरात राहणाऱ्या भारतीय नागरिकांवर केला होता. याबाबत कंपनीने असा दावा केला आहे की, हा सर्व्हे एका छोट्या समूहावर करण्यात आला असून त्यावरून संपूर्ण देशभरातील लोकांबाबत निष्कर्ष काढू शकत नाही. सर्व्हेतून मांडण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार, भारतातील मिडल क्लास वर्ग टेस्टी फूड खाण्यास जास्त प्राधान्य देतात आणि डाएटिंगबाबत ते फार कमी विचार करतात. 

आपल्या असलेल्या वजनामुळे संतुष्ट आहेत 74 टक्के लोक

या सर्व्हेची आणखी एक खास गोष्ट ही होती की, सर्व्हेमध्ये सहभागी झालेले 74 टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की, ते आपल्या सध्याच्या वजनामुळे फार संतुष्ट असून जर त्यांना चविष्ट पदार्थ आणि वजन कमी करणं यांपैकी एखाद्या गोष्टीची निवड करायला सांगितली तर ते चविष्ट पदार्थांची निवड करतील. तसेच 57 टक्के लोकांनी असंही सांगितलं की, ते आपलं वजन कमी करण्यासाठी कधी-कधी शरीरातील कॅलरी कमी करण्याचा प्रयत्न करतात. एवढचं नाही तर जवळपास 59 टक्के भारतीयांचं असं म्हणणं आहे की, जास्तीत जास्त डाएट प्लॅनचा त्यांना फायदाच होत नाही. 

Web Title: New survey claims 77 percent indians are happy with their weight think dieting is pointless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.