डेल्टासारखे नवे प्रकार संपूर्ण जगासाठी घातक, जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 02:10 PM2021-07-04T14:10:39+5:302021-07-04T14:11:36+5:30

"ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण अतिशय कमी आहे तिथे रुग्णालये बाधितांनी भरली आहेत. डेल्टामध्ये सतत उत्परिवर्तन होत असून तो पूर्वीच्या विषाणूंपेक्षा अधिक वेगाने पसरतो."

New types like Delta are dangerous for the whole world, the World Health Organization warned | डेल्टासारखे नवे प्रकार संपूर्ण जगासाठी घातक, जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा

डेल्टासारखे नवे प्रकार संपूर्ण जगासाठी घातक, जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा

Next

वॉशिंग्टन : कोरोनाचे डेल्टासारखे नवे प्रकार अतिशय घातक आहे. त्यामुळे सारे जग धोकादायक स्थितीतून जात आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी दिला आहे. ९८ देशांत डेल्टाचे अस्तित्व आढळले आहे. (New types like Delta are dangerous for the whole world, the World Health Organization warned)

ते म्हणाले की, ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण अतिशय कमी आहे तिथे रुग्णालये बाधितांनी भरली आहेत. डेल्टामध्ये सतत उत्परिवर्तन होत असून तो पूर्वीच्या विषाणूंपेक्षा अधिक वेगाने पसरतो. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करून सगळ्यांनी कोरोना साथीचा मुकाबला केला पाहिजे.

अत्यंत वेगाने पसरणारा
- डेल्टा विषाणू पहिल्यांदा भारतात आढळला. नंतर तो इतरत्र पसरला. 
- इतर प्रकारांवर मात करून डेल्टा विषाणू कोणत्याही भागात अतिशय वेगाने पसरतो. त्याच्यामुळेच या साथीची देशात दुसरी लाट आली.  बाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भीषण होती. 
- जगात काही महिन्यांत डेल्टा विषाणू अन्य कोरोना विषाणूंना वरचढ ठरेल असेही जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक अधनोम घेब्रिसस यांनी म्हटले आहे.
 

 

Web Title: New types like Delta are dangerous for the whole world, the World Health Organization warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.