रात्री झोप येत नाही? निवांत झोपेसाठी वापरा १०-३-२-१ फॉर्म्युला; ब्रिटनमध्ये जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 02:31 PM2021-09-28T14:31:49+5:302021-09-28T14:32:09+5:30

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस(NHS)च्या एका डॉक्टरनं या समस्येवर तोडगा काढण्यासाठी १०-३-२-१ फॉर्म्युला शोधून काढला आहे.

NHS doctor shares how the ‘10, 3, 2, 1 bedtime method’ will help you get a ‘perfect’ night’s sleep | रात्री झोप येत नाही? निवांत झोपेसाठी वापरा १०-३-२-१ फॉर्म्युला; ब्रिटनमध्ये जोरदार चर्चा

रात्री झोप येत नाही? निवांत झोपेसाठी वापरा १०-३-२-१ फॉर्म्युला; ब्रिटनमध्ये जोरदार चर्चा

Next

बदलत्या जीवनशैलीमुळं अनेकांना झोपेच्या समस्येला तोंड द्याव लागतं. झोप येत नाही म्हणून काहीजण गोळ्या घेतात. झोप अपुरी झाली तर अनेकांच्या तब्येतीत बिघाड होऊ शकतात. त्यामुळे झोप ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पुरेशा प्रमाणात झोप घेतल्याने बऱ्याच शारिरीक समस्येपासून तुम्ही स्वत:ची सुटका करू शकतात.

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस(NHS)च्या एका डॉक्टरनं या समस्येवर तोडगा काढण्यासाठी १०-३-२-१ फॉर्म्युला शोधून काढला आहे. डॉक्टरचा दावा आहे की, या फॉर्म्युल्याचा वापर केल्यास कुठल्याही औषधाविना किंवा उपचाराशिवाय सहजपणे चांगली झोप घेऊ शकता. डॉक्टरच्या या फॉर्म्युल्याची चर्चा ब्रिटनमध्ये खूप सुरू आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, NHS मध्ये असलेले मूळ भारतीय डॉक्टर राज करण यांनी हा फॉर्म्युला टिकटॉकवर शेअर केला आहे.

यात १०-३-२-१ ट्रिक सविस्तरपणे सांगताना म्हटलं आहे की, झोपण्यापूर्वी १० तास आधी कैफीन म्हणजे चहा-कॉफी, कोल्ड ड्रिंक्स याचे प्रमाण कमी करा. कैफीनच्या सेवनाने झोप उडून जाते. रात्री झोप नीट येत नाही. जर रोज रात्री तुम्ही १० वाजता बेडवर झोपता तर दुपारी १२ पासून तुम्हाला कैफीन(चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य) निगडीत गोष्टीचे सेवन बंद केले पाहिजे. पुढे डॉक्टर सांगतात की, झोपण्यापूर्वी ३ तास आधी हैवी डाइट अथवा ड्रिंक्स बंद करावेत. जेवण करून ते पचन होण्यासाठी ३ तासांचा अवधी पुरेसा आहे. त्यामुळे रात्री गॅस किंवा अपचनाची समस्या जाणवत नाही. काही अंथरुणावर सरळ पडल्यानंतर, डोळे लवकरच झोपेने ओझे होतात आणि व्यक्ती गाढ झोपेत जाते.

त्याचसोबत डॉक्टर राज करण यांनी तिसऱ्या ट्रिकबद्दल सांगितले आहे की, तुम्ही तुमचे नेहमीचे काम झोपेच्या २ तास आधी संपवा. असे केल्याने तुमचे मन मोकळे होईल. यामुळे, अंथरुणावर झोपताना, कार्यालयात किंवा घरातील कामांबाबत तुमच्या मनात अनावश्यक गोंधळ होणार नाही. यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल. तसेच झोपेच्या १ तास आधी (Perfect Night Sleep) आपला टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईल बंद करा म्हणजे स्क्रीनपासून दूर राहा. खरं तर, पडद्यावरून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांमध्ये वेदना होतात, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो. झोपेच्या एक तास आधी सर्व स्क्रीन बंद केल्याने डोळ्यांना आणि मनाला विश्रांती मिळते आणि तुम्ही लवकरच झोपेच्या अवस्थेत जाता.

Read in English

Web Title: NHS doctor shares how the ‘10, 3, 2, 1 bedtime method’ will help you get a ‘perfect’ night’s sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर