निकोटीनमुळे फक्त फुफ्फुसांचा नाही तर ९ प्रकारच्या कॅन्सरचा असू शकतो धोका; असा करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 10:04 AM2020-05-28T10:04:37+5:302020-05-28T10:09:02+5:30

साधारणपणे या कॅन्सरपासून बचाव करणं माणसाच्याच हातात असतं.

Nicotine can cause not only lung but also 9 types of cancer myb | निकोटीनमुळे फक्त फुफ्फुसांचा नाही तर ९ प्रकारच्या कॅन्सरचा असू शकतो धोका; असा करा बचाव

निकोटीनमुळे फक्त फुफ्फुसांचा नाही तर ९ प्रकारच्या कॅन्सरचा असू शकतो धोका; असा करा बचाव

Next

तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की, तंबाखू किंवा सिगारेटचं सेवन शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. पण तरीसुद्धा अनेकांना हे पदार्थ खाण्याचे व्यसन लागलेले असते. यामुळे फक्त फुफ्फुसांचा आणि तोंडाचा नाही तर ९ वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याासाठी घातक पदार्थांना स्वतःपासून लांब ठेवाल.

तंबाखूच्या सेवनाने फुफ्फुस खराब होण्याची भीती असते.  तंबाखूमुळे तोड, लिव्हर, अन्ननलिका, पोटाचा, पॅनक्रियाचा, सर्वाईकल कॅन्सर होण्याची शक्यता असते. साधारणपणे या कॅन्सरपासून बचाव करणं माणसाच्या हातात असतं. त्यासाठी तंबाखूचे सेवन न करणं फायदेशीर ठरतं. या व्यससाने अंतर्गत अवयव खराब होतात. 

लक्षणं

या कॅन्सरच्या सुरूवातीच्या  लक्षणांत तोंडाच्या आतल्या भागात पांढरे पॅचेस दिसून येतात. त्यामुळे अल्सरची समस्या उद्भवते. अन्ननलिकेचा कॅन्सर झाल्यास सुरूवातीला घास गिळण्यासाठी त्रास होतो. समस्या वाढल्यास व्यक्तीला पाणी प्यायला सुद्धा त्रास होतो.  जास्त प्रमाणात धुम्रपान केल्यास घसा बसणं, श्वास घ्यायला त्रास होणं, खोकल्यातून रक्त बाहेर येणं अशी लक्षणं दिसून येतात.  तंबाखूच्या सेवनाने शरीरातील समस्या वाढत जातात. माणसाच्या पेशींमध्ये सिगारेटचा धूर पोहोचल्यामुळे पुढे गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय सीओपीडी, टीबी, निमोनिया या आजारांचा धोका जास्त असतो. 

तंबाखूचं सेवन टाईप२ डायबिटिस, एसिडीटीच्या समस्यांचं कारण ठरू शकतं. त्यामुळे हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता भासू शकते. परिणामी ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो. तंबाखूचे व्यसन असलेल्या महिलांना या आजारांशिवाय प्रीमेच्योर मेनोपोज़, स्पॉन्टेनियस एबॉर्शन, सर्विकल कँसरचा धोका असू शकतो. 

उपाय  

तंबाखूमध्ये निकोटीन असतं. त्यामुळे तंबाखूची लत लागू शकते. अशा स्थितीत निकोटीन रिप्लेसमेंट थेरेपीने तुम्ही व्यसन सोडू शकता. 

सगळ्यात आधी तंबाखूच्या सेवनाचं प्रमाण कमी करा. डॉक्टरांची मदत घ्या.

स्वतःला मानसिकरित्या व्यसनांच्या आहारी न जाण्यासाठी तयार करा. 

संतुलित आहार घ्या.

'या' डासांमधील बॅक्टेरियांमधून कोरोनाचा विषाणू होणार नष्ट; चीन आणि अमेरिकेतील तज्ज्ञांचा दावा

परदेशातून आलेल्या लोकांना फक्त कोरोनाच नाही; तर 'या' ८ व्हायरसचा असू शकतो धोका

Web Title: Nicotine can cause not only lung but also 9 types of cancer myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.