रात्रीच्या या दोन सवयींमुळे वाढतो कमी वयात मृत्यूचा धोका, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 02:18 PM2023-06-19T14:18:03+5:302023-06-19T14:18:34+5:30
Health : आता फिनलॅंडच्या काही अभ्यासकांनी दावा केला आहे की, रात्री जास्त वेळ जागणाऱ्या लोकांना मृत्यूचा धोका इतरांच्या तुलनेत जास्त असतो.
Why ‘Night owls’ Die Sooner : आजकाल मोठ्या संख्येने लोक रात्री उशीरापर्यंत जागतात. रात्री उशीरापर्यंत जागणं हे आरोग्यासाठी फार नुकसानकारक असतं. याने आपली स्लीप सायकल बिघडते आणि अनेक आजारांचा धोका वाढतो. आतापर्यंत याबाबत अनेक रिसर्च करण्यात आले आहेत. ज्यात रात्री जागण्याच्या नुकसानांबाबत सांगण्यात आलं आहे. आता फिनलॅंडच्या काही अभ्यासकांनी दावा केला आहे की, रात्री जास्त वेळ जागणाऱ्या लोकांना मृत्यूचा धोका इतरांच्या तुलनेत जास्त असतो.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, फिनलॅंडमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, रात्रभर जागणाऱ्या लोकांना इतरांच्या तुलनेत मृत्यूचा धोका अधिक असतो. अभ्यासकांनुसार, त्यांना याचं कारणही समजलं आहे.
रात्री जागणारे लोक लवकर उठणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त स्मोकिंग आणि मद्याचं सेवन करतात. याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि कमी वयातच त्यांचा मृत्यू होण्याचा धोका अधिक वाढतो.
अभ्यासकांनी जवळपास 23 हजार लोकांचा 1981 ते 2081 पर्यंतचा डेटा जमा केला. त्यानंतर 8728 लोकांच्या मृत्यूचं विश्लेषण केलं. यातून समोर आलं की, रात्री लवकर झोपणाऱ्या आणि सकाळी लवकर उठणाऱ्या लोकांच्या तुलनेत रात्रभर जागणाऱ्या लोकांना मृत्यूचा धोका 9 टक्के अधिक असतो.
हेलसिंकीमध्ये फिनिश इंस्टीट्यूट ऑफ ऑक्यूपेशनल हेल्थकडून हा रिसर्च करण्यात आला. याचे लेखक क्रिस्टर हब्लिन यांच्यानुसार, रात्रभर जागणाऱ्या लोकांना मृत्यूचा धोका स्मोकिंग, तंबाखू आणि मद्याच्या अधिक सेवनाने जास्त राहतो. खास बाब ही आहे की, जे लोक रात्रभर जागतात, पण दारू किंवा सिगारेट पित नाही, त्यांना मृत्यूचा धोका नसतो.
रात्री जास्तवेळ जागण्याचा प्रभाव मानसिक आरोग्यावर पडतो. असं केल्याने मानसिक आरोग्य बिघडतं. 2019 मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, ज्या महिला सकाळी लवकर उठत नाहीत, त्यांना सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांच्या तुलनेत स्तन कॅन्सरचा धोका जास्त असतो. रात्री जास्तीत जास्त लोक मोबाइल किंवा लॅपटॉपवर जास्त वेळ घालवतात. जे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.