नऊ दिवसांचे उपवास सोडताय? या गोष्टींची घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 10:09 AM2018-10-18T10:09:57+5:302018-10-18T10:10:12+5:30
नवरात्रीच्या ९ दिवसात अनेकजण उपवास करुन देवीला प्रसन्न करतात. उपवासाचं धार्मिक महत्त्व असलं तरी याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.
नवरात्रीच्या ९ दिवसात अनेकजण उपवास करुन देवीला प्रसन्न करतात. उपवासाचं धार्मिक महत्त्व असलं तरी याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. या दिवसात काही लोक केवळ फळे खाऊन उपवास करतात. तर काही लोक फार कठीण उपवास करतात. अशात हा उपवास सोडताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं असतं.
१) हलक्या पदार्थांनी करावी सुरुवात
अनेक दिवस पोट रिकामं राहिल्यानंतर सर्वातआधी तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायला हवं. जेणेकरुन पोटाला थंड वाटेल आणि त्यानंतर जेवण योग्य प्रकारे पचन होईल. तुम्ही ज्यूसही घेऊ शकता. लस्सी, नारळ पाणी किंवा मोसंबीचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता. याने तुम्हाला एनर्जी मिळेल आणि याने तुमची पचनक्रियाही योग्य होईल.
२) प्रोटीन आहे गरजेचं
उपवास सोडल्यानंतर प्रोटीन असलेल्या आहाराचं सेवन करावं. इतके दिवस उपवास करुन शरीराची एनर्जी कमी झालेली असते. अशात शरीराला एनर्जी मिळण्यासाठी प्रोटीनयुक्त आहाराची गरज असते. त्यामुळे काही वेळ थांबून पनीर, मोड आलेले कडधान्य, डाळीचं पाणी सेवन करु शकता.
३) मसालेदार पदार्थ टाळा
उपवास सोडल्यावर लगेच मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाऊ नका. असे केल्यास तुमच्या पचनक्रियेवर दबाव पडेल आणि तुमचं आरोग्य अडणीत येऊ शकतं. त्यामुळे हलके पदार्थ खावे.
४) फास्टफूड टाळा
खूप दिवसांनी तुम्ही उपवास सोडला तर जड पदार्थ खाणे टाळा. कारण उपवास करताना मेटाबॉलिज्म स्लो होतं. त्यामुळे एकाएकी जड पदार्थ खाणे टाळले पाहिजे. फास्टफूडही लगेच खाऊ नका. जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे.